भाजपा नेते नरेंद्र मोदी हे रविवार, ९ जून रोजी सायंकाळी पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत. यासाठी शेजारी देशातील प्रमुखांना निमंत्रण देण्यात आलं असून देशातील अनेक व्यक्तींना या सोहळ्याचे निमंत्रण देण्यात आले आहे. अशातच आता माहितीनुसार, काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे हे रविवारी नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत, असे काँग्रेसकडून स्पष्ट करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचा निर्णय इंडी आघाडीच्या घटक पक्षांशी चर्चा करून घेण्यात आला आहे, अशी माहिती आहे.
शनिवारी, काँग्रेस कार्यकारिणीची बैठक पार पडली होती. यावेळी लोकसभा विरोधी पक्षनेते पदी राहुल गांधी यांची नियुक्ती करण्याचा ठराव मंजूर केला. राहुल गांधी ही भूमिका स्वीकारण्याबाबत लवकरच निर्णय घेतील, तर पक्षाच्या नेत्या सोनिया गांधी यांनी काँग्रेस संसदीय पक्षाचे अध्यक्षपद स्वीकारले.
हे ही वाचा:
काँग्रेसची ‘खटाखट योजना’ म्हणजे मतदारांना लाच देणे; ९९ खासदारांना अपात्र ठरवण्याची मागणी
एअर कॅनडाच्या विमानाला टेकऑफनंतर आग; विमान सुरक्षितपणे उतरवण्यास यश!
काँग्रेसच्या प्रमुखांना पंतप्रधानांच्या शपथविधी सोहळ्याचे निमंत्रण!
संगीतकार विशाल दादलानीला सोशल मीडियावर ठोकून काढले!
रविवारी संध्याकाळी ७.१५ वाजता राष्ट्रपती भवनात शपथविधी सोहळा होणार असून, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू नरेंद्र मोदी आणि त्यांच्या मंत्रिमंडळाला शपथ देतील. दरम्यान, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी स्पष्ट केले की, इंडी आघाडीचा घटक पक्ष असलेला तृणमूल काँग्रेस पक्ष नव्या सरकारच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार नाही. नरेंद्र मोदी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून शपथ घेणार असून, या कार्यक्रमाला विविध प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत.