देशामध्ये शतकोटी लसीकरणाचा महत्त्वाचा टप्पा पार पडलेला आहे. त्यासंदर्भात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीररित्या जनतेशी संपर्क साधला आणि नागरिकांचे अभिनंदन करत त्यांच्या सहभागामुळे हे शक्य झाल्याबद्दल त्यांची प्रशंसा केली होती. काँग्रेसला मात्र ते अजिबात पचनी पडलेले नाही. त्यांनी चीनच्या तुलनेत भारत कसा मागे आहे, असे वक्तव्य करत मोदीविरोधासाठी आपण कोणत्या थरापर्यंत जाऊ शकतो, याचे प्रत्यंतर आणून दिले आहे.
काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते गौरव वल्लभ म्हणाले, “भारत हा पहिला देश नाही जिथे १०० कोटी लसीचे डोस दिले गेले.” १६ सप्टेंबर २०२१ पर्यंत, चीनच्या ८० टक्के लोकसंख्येला लसीचे दोन्ही डोस देण्यात आले होते. १६ सप्टेंबरपर्यंत चीनमध्ये २१६ कोटी डोस दिले गेले. दुसरे म्हणजे, जगातील फक्त दोन देशांची लोकसंख्या ५०० दशलक्षांपेक्षा जास्त आहे. चीन आणि भारत. तर ज्या देशाची लोकसंख्या फक्त तीन कोटी आहे त्या देशाशी आपण काय तुलना करावी? तीन कोटी लोकसंख्या असलेल्या देशात फक्त सहा कोटी डोस घेतील, नाही का?
हे ही वाचा:
मास्क न घालणारे राज ठाकरेच कोरोनाग्रस्त
वेंकटेश प्रसाद-आमिर सोहेल चकमकीच्या आठवणी झाल्या ताज्या
‘NobindiNoBusiness’ हॅशटॅगने सुतकी दिवाळी जाहिरातींना दिला दणका
बांगलादेशातील हिंदुंवरील हल्ल्यांविरोधात ठाण्यात उठला आवाज
चीनने कसे उत्तम लसीकरण केले असे म्हणत काँग्रेसला चीनचाच उमाळा आल्याचे त्यांच्या टिप्पणीवरून दिसते आहे. याआधी, आपले लसीकरण मागे आहे, ब्रिटन, अमेरिका, जर्मनी यांनी कसे लसीकरण पूर्ण केले असा आरोप केला जात होता. त्यावेळी त्या देशांची लोकसंख्या भारताच्या तुलनेत किती कमी आहे, हा विचार काँग्रेसजनांच्या मनात आला नव्हता मात्र आता या देशांशी तुलना करून भारताच्या १०० कोटी लसींचे कौतुक कशाला असा उलटा सवाल काँग्रेसचे प्रवक्ते करत आहेत.
काँग्रेसचे चीनवरील प्रेम लपून राहिलेले नाही. भारतात घुसखोरी करू पाहणाऱ्या चीनला सवाल विचारण्यापेक्षा किंवा त्यासाठी मोदी सरकारसोबत असल्याचे सांगण्यापेक्षा भारतावरच प्रश्नचिन्ह काँग्रेसने वेळोवेळी केलेला आहे. मोदी सरकार देशात आल्यापासून देशाप्रती काहीही अभिमानास्पद बोलायचे नाही, असाच प्रयत्न काँग्रेसने केलेला आहे, याचेच हे उदाहरण असल्याची आता चर्चा होऊ लागली आहे.