काँग्रेस, पवार, ठाकरेंनी शस्त्रे परजली होती, पण आता सगळे चिडीचूप!

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची टीका

काँग्रेस, पवार, ठाकरेंनी शस्त्रे परजली होती, पण आता सगळे चिडीचूप!

हरियाणा विधानसभेचा काल निकाल पार पडला. या निकालात भाजपने मुसंडी मारत विजय हासील केला. निकालापूर्वी विरोधकांकडून काँग्रेस जिंकणार भाजप हद्दपार होणार अशा खोट्या अफवा पसरवण्यास आल्या होत्या. मात्र, कालच्या निकालानंतर विरोधक चांगलेच तोंडावर पडले. निकालापूर्वी काँग्रेसकडून जय्यत तयारी देखील करण्यात आली होती, जागो-जागी जिलेबी वाटण्यासाठी स्टॉल, ढोल-ताशे, मिरवणुकीसाठी टांगा घोडा देखील मागवण्यात आला होता.

मात्र, दुपारनंतर निकालाचे चित्र बदलले आणि काँग्रेसच्या सर्व आयोजनावर पाणी फेरले. मविआकडून देखील टीकेसाठी तशीच तयारी करण्यात आली होती, मात्र आता सर्वजण चिडीचूप आहेत. हरियाणाच्या निकालानंतर मविआच्या नेत्यांवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार टीका केली आहे.

हे ही वाचा : 

लालू प्रसाद यांच्या नातेवाईकाकडून २५ कोटींची मालमत्ता जप्त!

जम्मू- काश्मीरच्या अनंतनागमधून दहशतवाद्यांकडून दोन जवानांचे अपहरण

घटना घडून पाच दिवस झाल्यानंतर बोपदेव घाट परिसर पाहणीचा देखावा कशासाठी?

आरबीआयकडून दिलासा; सलग दहाव्यांदा रेपो रेट जैसे थे स्थितीत

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रसार माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले, काँग्रेस, शरद पवार गट आणि उबाठा गट हे सर्वजण काल शस्त्रे चमकवून बसले होते की, कुठे हरियाणामध्ये भाजप हरतो आणि आम्ही भाजपवर हल्ला करतो. पण सर्वांना तशी संधी मिळाली नाही. देशाचा मूड काय?, हा आता त्यांच्या लक्षात आलेला आहे. त्यामुळे हेच लोक काल ‘हम साथ साथ है’ म्हणणारे आज ‘हम तुम्हारे है कोण’ म्हणत आहेत, असे फडणवीस म्हणाले.

ते पुढे म्हणाले, या निकालाने एक स्पष्ट झाले ते म्हणजे, फेक नरेटिव्ह हा ब्रेक झालाय. लोकसभेत फेक नरेटीव्ह तयार करण्यात आला होता, मात्र आता लोकांच्या लक्षात आलेले आहे, असे फडणवीस म्हणाले.

Exit mobile version