राज्यात जिथे एकीकडे रेमडेसिवीरचा तुटवडा जाणवत आहे तिकडे दुसरीकडे या इंजेक्शनचा काळाबाजारही खूप वाढला आहे. शनिवारी खारघर पोलीसांनी अशाच एका काळाबाजार करणाऱ्या इसमाला अटक केली आहे. हा काळाबाजार करणारा इसम महाराष्ट्रातील सत्तधारी काँग्रेस पक्षाचा पदाधिकारी आहे.
देशात सध्या कोविडची दुसरी लाट सुरु आहे. सारा देश या लाटेत होरपळून निघत आहे. कुठे बेड्स मिळत नाहीयेत, कुठे ऑक्सिजनची कमतरता आहे तर कुठे व्हेंटिलेटर नाहीयेत. कोविडच्या उपचारात अत्यंत महत्वपूर्ण असणाऱ्या रेमडेसिवीर इंजेक्शनचाही तुटवडा जाणवत आहे. रेमडेसिवीरची मागणी अधिक आहे आणि पुरवठा कमी. अशा परिस्थितीत या इंजेक्शनचा काळा बाजारही मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. असाच एक प्रकार नवी मुंबई इथल्या खारघरमध्ये उघडकीस आला.
हे ही वाचा:
धर्मांतरासाठी ५०,००० रुपयांची लालूच, नकार दिल्यावर मारहाण
केंद्राने निधी दिला, तरीही ठाकरे सरकारने उभारले नाहीत ऑक्सिजन प्लॅन्ट्स
पंढरपूर मधील कोरोना प्रसाराला नागरिक जबाबदार
ठाकरे सरकारने वसुलीशिवाय काय केलंय?
शनिवार, २४ एप्रिल रोजी खारघर पोलिसांनी रेमडेसिवीरचा काळा बाजार करणाऱ्या हरपिंदर वीर याला अटक केली आहे. हरपिंदर वीर हा काँग्रेस पक्षाचा पदाधिकारी आहे. वीर हा १५००० ला एक इंजेक्शन विकत काळाबाजार करत होता. पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी या संबंधीचे ट्विट करत हरपिंदर वीरचे संभाषण शेअर केले आहे. याचवेळी त्यांनी ठाकरे सरकारवरही निशाणा साधला आहे. “सत्ताधारी पक्षाचे कार्यकर्ते रेमडेसिवीरचा काळा बाजार करत असतील तर सामान्य जनतेचे काय?” असा सवाल ठाकुरांनी विचारला आहे.
#Remdesivir चे एक इंजेक्शन प्रत्येकी १५ हजाराला काळ्या बाजाराने विकणाऱ्या काँग्रेस वाहतूक सेल पदाधिकाऱ्याला खारघर येथे अटक केली आहे.सत्ताधारी पक्षाचे कार्यकर्ते #Remdesivir चा काळा बाजार करत असतील तर सामान्य जनतेचे काय ?आरोग्यमंत्री @rajeshtope11 जी आपल्याकडून कडक कारवाई व्हावी! pic.twitter.com/FLWF3WGYml
— Prashant Thakur (@ithakurprashant) April 24, 2021