देशात नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसला अनपेक्षित असे यश मिळाले. या पार्श्वभूमीवर काँग्रेसने राज्यातील सर्व मतदारसंघांमध्ये ११ ते १५ जून दरम्यान ‘धन्यवाद यात्रा’ काढण्याची घोषणा केली आहे. या यात्रेत काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि कार्यकर्ते सहभागी होण्याची शक्यता आहे. तसेच यात्रेदरम्यान विविध समाजातील व्यक्तींचा संविधानाची प्रत देऊन सन्मान करण्यात येणार आहे.
काँग्रेसने उत्तर प्रदेशात लोकसभेच्या ८० पैकी सहा जागा जिंकल्या. तर, इंडी आघाडीतील घटक पक्ष समाजवादी पार्टीने (एसपी) ३७ जागा मिळवल्या. यामुळे भाजपा इकडे मागे पडली. याचं पार्श्वभूमीवर ‘धन्यवाद यात्रा’ काढण्याची घोषणा करण्यात आली आहे. यापूर्वीही काँग्रेसने ‘भारत जोडो यात्रा’ आणि ‘भारत जोडो न्याय यात्रा’ काढली होती. राहुल गांधी यांनी या यात्रांचे नेतृत्व केले होते. त्यामुळे या यात्रेचे नेतृत्वही राहुल गांधी यांच्याकडे असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
हे ही वाचा:
शेअर्समध्ये घोटाळा झाल्याचा आरोप करणाऱ्या राहुल गांधींचे शेअर्स वधारले
पुणे अपघातातील आपल्वायीन आरोपीच्या आजोबांच्या एमपीजी क्लबवर चालविला बुलडोझर
शपथविधीच्या पार्श्वभूमीवर दिल्ली हाय अलर्टवर; परिसर नो फ्लाय झोन घोषित
‘ईव्हीएम’ जिवंत आहे की मेली?, मोदींचा इंडी आघाडीवर निशाणा!
राज्यातील सर्व ४०३ विधानसभा जागांवरून ही यात्रा जाणार आहे. पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि प्रदेश प्रभारी अविनाश पांडे यांनी ही माहिती दिली. राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून जनता आमच्याशी जोडली गेल्याचे ते म्हणाले. देशाचे संविधान धोक्यात आले. उत्तर प्रदेशातील जनतेने आपली जबाबदारी चोख पार पाडली. काँग्रेसच्या प्रत्येक कार्यकर्त्याने व पदाधिकाऱ्याने साधनांची कमतरता असतानाही पूर्ण सहकार्य केले आणि मेहनत घेतली. राज्यात नवा बदल झाला आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत सपाला एक आणि काँग्रेसला पाच जागा जिंकता आल्या होत्या.