आढावा बैठकीच्या नावाखाली काँग्रेसची कव्वाली मैफिल

आढावा बैठकीच्या नावाखाली काँग्रेसची कव्वाली मैफिल

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमुळे महाराष्ट्रातील काँग्रेस पक्ष सध्या चर्चेत आहे. या व्हायरल व्हिडिओमध्ये, आढावा बैठकीच्या नावावर कव्वालीची मैफिल काँग्रेसच्या व्यासपीठावर रंगलेली दिसत आहे. बैठकीच्या व्यासपीठावरून कलाकार संपूर्ण तयारीनिशी पेटीवर सुर लावत कव्वाली सादर करताना दिसत आहेत. या व्हिडीओवरून आता महाराष्ट्र काँग्रेस कमिटीवर पुन्हा एकदा सवाल उपस्थित होत आहेत.

महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव अजूनही कमी झालेला नाही. राज्यात टप्प्याटप्प्याने अनलॉक होत असला तरीही अनावश्यक गर्दी टाळण्याचे आवाहन प्रशासनाकडून वारंवार करण्यात येत आहे. पण राज्याच्या सरकारमधील महत्त्वाचा पक्ष असलेला काँग्रेस पक्ष मात्र कोरोनाचे नियम पायदळी तुडवत पक्षाचे कार्यक्रम घेताना दिसत आहे.

हे ही वाचा:

राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांनी लस घेतली का?

…आणि त्यांच्या शरीराला चिकटले चमचे, नाणी

चीनच्या लशीला सौदी अरेबियातही किंमत नाही

तुमच्या खांद्यावर निष्पाप प्रेतांचे ओझे वाढतेय… जरा चाड बाळगा

काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या काँग्रेस पक्षाच्या एका आढावा बैठकीत कोरोना नियमांची पायमल्ली झाल्याचे दिसून येते. या बैठकीला प्रमुख मार्गदर्शक म्हणून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे उपस्थित राहणार होते. पण यावेळी बैठकीच्या नावावर कव्वालीची मैफिल रंगल्याचा एक अजब प्रकार आढळून आला. जिथे व्यासपीठावरून नेत्यांची मार्गदर्शनपर भाषणे झाली पाहिजेत, तिथे पेटीच्या सुरांवर कव्वाली सादर केली जात होती. इतकंच नाही तर उपस्थितांमध्ये काही अतिउत्साही लोक कलाकारांवर नोटांची उधळण करत होते.

यावेळी ना सोशल डिस्टंसिंगचे भान कोणाला होते, ना अनेकांच्या चेहऱ्यावर मास्क लावलेले होते. काँग्रेसच्या या कव्वाली बैठकीची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे. आढावा बैठकीतून कार्यकर्ते उठून जाऊ नयेत यासाठी, किंवा बैठकीला सभागृह भरलेले दिसावे म्हणून गर्दी खेचण्यासाठी कव्वालीचा कार्यक्रम ठेवला गेला का? असा सवाल शेतकरी विचारत आहेत.

Exit mobile version