राम मंदिराबाबत काँग्रेसने पुन्हा गरळ ओकली

कर्नाटकातील आमदाराचे वादग्रस्त वक्तव्य

राम मंदिराबाबत काँग्रेसने पुन्हा गरळ ओकली

देशात पुढील वर्षी लोकसभा निवडणूक होणार असून या निवडणुकीसाठीच्या मोर्चेबांधणीला सर्व पक्षांकडून सुरू झाली आहे. आरोप- प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. या दरम्यान काँग्रेस आमदाराने राम मंदिराबद्दल धक्कादायक वक्तव्य केल्यामुळे खळबळ उडाली आहे.

लोकसभा निवडणुकीला काही महिने उरलेले असताना राजकीय पक्षाच्या नेत्यांमध्ये आरोप- प्रत्यारोपांची मालिका सुरू झाली आहे. “आगामी लोकसभा निवडणुकीत एकगठ्ठा हिंदू मतांसाठी भगवा पार्टी राम मंदिरावर बॉम्बस्फोट करेल आणि त्याचा आरोप मुस्लिमांवर करेल. हे सर्व लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी होऊ शकतं,” अशी गरळ कर्नाटकातील काँग्रेस आमदार बी. आर. पाटील यांनी ओकली आहे.

कर्नाटक भाजपाने ‘एक्स’वर (टि्वटर) हा व्हिडिओ शेअर केला आहे. नरेंद्र मोदींनी पुढची लोकसभा निवडणूक जिंकावी यासाठी भाजपा राम मंदिरावर बॉम्ब फेक करु शकते आणि एकगठ्ठा हिंदू मत मिळवण्यासाठी आरोप मुस्लिमांवर लावला जाऊ शकतो” असं बी. आर. पाटील या व्हिडिओमध्ये बोलताना दिसतायत. बी. आर. पाटील यांनी हे विधान एका मुलाखतीत केल्याची शक्यता असून त्याबद्दल अद्याप स्पष्टता नाही. ‘इंडिया टुडे’ने याबाबत वृत्त दिलं आहे.

बी. आर. पाटील यांचा हा व्हिडीओ समोर आल्यानंतर भाजपाने काँग्रेसवर निशाणा साधला आहे. काँग्रेस पक्ष हिंदू- मुस्लिम तणावाला खतपाणी घालत असल्याचा आरोप भाजपाने केला आहे. “हिंदू धर्माच्या मुळावरच प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या काँग्रेस सदस्यांनी आधीच राम मंदिरावर आपले लक्ष केंद्रित केले आहे. राममंदिरालाच हादरवून हिंदू- मुस्लिम दंगल घडवून सरकारवर आरोप करायचे,” अशी टीका भाजपाने केली आहे.

हे ही वाचा:

२६/११ हल्ला प्रकरणात चौथे पुरवणी आरोपपत्र दाखल, कॅप्टन तहव्वूर हुसैन राणाचा आरोप पत्रात उल्लेख

भारतीय वायुदलात ‘सी-२९५’ वाहतूक विमान दाखल!

पंकजा मुंडेंच्या वैद्यनाथ सहकारी कारखान्याची १९ कोटी रुपयांची मालमत्ता केली जप्त !

किरीट सोमय्यांना कथित व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी

कर्नाटकात लोकसभेच्या एकूण २८ जागा असून २०१९ सालच्या लोकसभा निवडणुकीत भाजपाने एकूण २५ जागा जिंकल्या. तर, काँग्रेसच्या वाट्याला फक्त तीन जागा आल्या. यावर्षी एप्रिल- मे मध्ये कर्नाटकात विधानसभेची निवडणूक झाली. त्यामध्ये काँग्रेसने बहुमत मिळवले होते.

Exit mobile version