राहुल गांधींच्या काँग्रेस पक्षाने स्वातंत्र्य सैनिकांचा अपमान करण्याची आपली मालिका सुरू ठेवली आहे. काँग्रेस पक्षाकडून पुन्हा एकदा थोर स्वातंत्र्य सेनानी वीर सावरकर यांचा अपमान करण्यात आला आहे. यावेळी त्यासाठी इंस्टाग्राम हे माध्यम वापरण्यात आले आहे. काँग्रेस पक्षाच्या अधिकृत इंस्टाग्राम खात्यावरून सावरकरांचा अपमान करणारा एक व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे.
एका मिनिटाच्या या व्हिडिओमध्ये काही कारण नसताना पुन्हा एकदा सावरकरांच्या कथित माफीनाम्याचा विषय काढून त्यांची बदनामी करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. या व्हिडिओमध्ये सावरकरांचा फोटो वापरण्यात आला असून बॅकग्राऊंडला जस्टिन बीबर या प्रसिद्धी इंग्रजी पॉप गायकाच्या ‘सॉरी’ या गाण्याचे बोल वाजत आहेत. या व्हिडिओच्या सुरूवातीलाच इंग्रजीमध्ये ‘इंग्लंडच्या राजाला उद्देशून..’ असे शब्द लिहून येतात आणि मग पुढे संपूर्ण गाणे वाजते.
हे ही वाचा:
बाप रे! मुंबईत ७ महिन्यांत घडले ५५० बलात्काराचे गुन्हे
ठाकरे सरकार बेजबाबदार आणि असंवेदनशील! महिला आयोगाचे ताशेरे
पैशाचे आमिष दाखवून धर्मांतर करणारा ख्रिस्ती भोंदू अटकेत
अनिल परबांच्या ‘त्या’ अनधिकृत कार्यालयावर पडणार हातोडा!
पण काँग्रेसचा हा खोडसाळपण लोकांना भावलेला दिसत नाही. काँग्रेसच्या या व्हिडिओसाठी त्यांच्यावर चौफेर टीका होताना दिसत आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांसारख्या प्रखर राष्ट्रभक्ताचा अपमान करण्याची ही काँग्रेसची पहिलीच वेळ नाही. काँग्रेस पक्षाकडून वारंवार खोटेनाटे आरोप करत स्वातंत्र्यवीर सावरकरांची बदनामी करण्याचा प्रयत्न केला जातो. हा व्हिडिओ देखील त्याचाच एक भाग आहे.