म्हणे, काँग्रेस पुनावालांना संरक्षण देणार!

म्हणे, काँग्रेस पुनावालांना संरक्षण देणार!

महाराष्ट्रात काँग्रेसची स्वतःची स्थिती सुरक्षित नाही, पण ते सिरम इन्स्टिट्यूटचे प्रमुख अदर पुनावाला यांना सुरक्षा देण्याची भाषा करत आहेत. पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटच्या पुनावाला यांना धमकी दिल्याचे प्रकरण सध्या गाजत आहे. सध्या पुनावाला हे लंडनला आहेत. तिथे एका मुलाखतीदरम्यान त्यांना लसीचा पुरवठा करण्यावरून धमक्या देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले होते. शिवसेना नेते पुनावाला यांना त्यांच्या फॅक्टरीबाहेर धमकावत असल्याचा व्हीडिओ टीव्ही पत्रकार राहुल कंवल यांनी शेअर केला होता. त्यावरूनही बराच वाद उफाळून आला.

कुणाला सिकंदर मिळाला, कुणाला समाधान

‘आम्ही इथे इंजेक्शन देऊन मारले आहेत’

देशात कोरोना रुग्णसंख्येत घट

मोदी सरकारच्या ‘या’ निर्णयामुळे ऑक्सिजन बेडचा प्रश्न सुटणार

त्यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे की, जर पुनावाला यांना केंद्र सरकार संरक्षण देऊ शकत नसेल तर काँग्रेसकडून त्यांना संरक्षण देण्यात येईल. कदाचित पुनावाला हे पुण्यातील आहे आणि पुणे हे महाराष्ट्रातच आहे, याचा विसर पटोले यांना पडला असावा. महाराष्ट्रात सध्या त्यांचाच काँग्रेस पक्ष असलेले महाविकास आघाडीचे सरकार आहे, हेही काही काळ ते विसरले असावेत. त्यामुळेच त्यांनी राज्यातील ठाकरे सरकारकडून सुरक्षा देण्यात काय कमतरता राहून गेली, हे सांगण्यापेक्षा त्या संरक्षणाची जबाबदारीही केंद्रावर ढकलली आहे. आणि आता केंद्र ही जबाबदारी उचलणार नसेल तर काँग्रेसचे कार्यकर्ते पुनावाला यांना संरक्षण देतील असे छाती फुगवून ते सांगत आहेत.
देशातील आज सुरू असलेल्या लसीकरणाच्या मोहिमेत सिरम इन्स्टिट्यूटच्या कोव्हिशिल्डचा मोठा वाटा आहे. कोव्हॅक्सिन ही लसही भारतीयांना सध्या दिली जात आहे. कोव्हिशिल्ड लशींची मागणी करणारे काही धमक्यांचे फोन पुनावाला यांना आले. त्यांनी लंडनमधील युके टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत याचा उल्लेख केला आहे. भारतातील काही शक्तीशाली नेते आणि उद्योगपती आपल्याला फोनवरून धमकावत आहेत. ज्यात काही मुख्यमंत्रीही आहेत असा आरोप त्यांनी केला होता. सगळ्यांकडून कोव्हिशिल्डचा तातडीने पुरवठा करा, अशी सक्ती केली जात आहे.
बुधवारी पुनावाला यांना वाय दर्जाची सुरक्षा केंद्राकडून पुरविण्यात आली. केंद्रातील सूत्रांनी सांगितले की, पुनावाला यांना असलेला धोका लक्षात घेता त्यांना ही सुरक्षा पुरविण्यात आली आहे.
पुनावाला यांनी या मुलाखतीत म्हटले आहे की, अशा धमक्या देणे आकलनापलीकडचे आहे. लसींचा पुरवठा करण्यावरून माझ्यावर प्रचंड दबाव येत आहे. सगळ्यांनाच वाटते आहे की, त्यांना लस प्रथम मिळावी. लोकांना एवढ्या जास्त अपेक्षा असतील असे वाटले नव्हते. आपल्याअगोदर अन्य कुणालाही लस मिळू नये असे लोकांना वाटू लागले आहे.
या धमक्यांना कंटाळूनच पुनावाला यांनी लंडनचा मार्ग धरला. टीव्ही पत्रकार राहुल कंवल यांनीही अदर पुनावाला यांनी आपल्याला व्हीडिओ पाठविल्याचे म्हटले होते. त्यात शिवसेनेचे गुंड पुनावाला यांच्या फॅक्टरीच्या बाहेर उभे राहून लशींची मागणी करत होते आणि पुनावाला यांना धमकावत होते, असे कंवल यांनी म्हटले होते.

Exit mobile version