काँग्रेस नेते आणि पी चिदंबरम यांचे पुत्र कार्ती चिदंबरम यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. नरेंद्र मोदी यांचे कौतुक करणं कार्ती यांना चांगलेच महागात पडले आहे. त्यामुळे त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. कार्ती चिदंबरम यांना काँग्रेसने कारणे दाखवा नोटीस पाठवली आहे.
एका मुलाखतीत कार्ती चिदंबरम म्हणाले होते की, राहुल गांधींच्या तुलनेत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अधिक लोकप्रिय आहेत. यानंतर काँग्रेसच्या शिस्तपालन समितीचे प्रमुख के. आर. रामस्वामी यांनी कार्ती यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. दहा दिवसात कार्ति चिदंबरम यांनी उत्तर द्यावं असंही शिस्तपालन समितीने म्हटलं आहे.
ज्या मुलाखतीत कार्ती चिदंबरम यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कौतुक केलं आहे त्याच मुलाखतीत त्यांनी ईव्हीएमवरही विश्वास दाखवला आहे. एकीकडे काँग्रेसकडून सातत्याने ईव्हीएम प्रणाली सदोष असल्याचे आरोप होताना दिसत आहेत. अशात ईव्हीएम विश्वासार्ह असल्याचं वक्तव्यही कार्ती चिदंबरम यांनी केलं आहे. या दोन्ही वक्तव्यांमुळे त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत.
हे ही वाचा:
मालदीववरून शरद पवार मोदींच्या पाठीशी!
लक्षद्वीपच्या मिनिकॉय बेटावर नवं विमानतळ बांधणार; नागरी, लष्करी विमाने उतरवता येणार
चिराग शेट्टी आणि सात्विकसाईराज रँकीरेड्डीला खेलरत्न तर शमीला अर्जुन!
लाइटहाऊस’ प्रकल्प करेल दीपस्तंभाप्रमाणे काम
भारत जोडो यात्रेनंतर आता काँग्रेसने भारत जोडो न्याय यात्रा काढणार आहे. ही यात्रा मणिपूर ते मुंबई अशी आयोजित करण्यात आली आहे. १४ जानेवारीपासून ‘भारत जोडो न्याय यात्रे’ला सुरुवात होणार आहे. मणिपूर मधून सुरु झालेली यात्रा २० मार्च रोजी मुंबईत पोहोचेल. मुंबईत या यात्रेचा समारोप होणार आहे.