साडेतीनशे कोटींचं घबाड सापडण्यापूर्वी काँग्रेस खासदार साहू काळ्या पैशाने होते व्यथित

२०२२ च्या ट्वीटचा फोटो व्हायरल

साडेतीनशे कोटींचं घबाड सापडण्यापूर्वी काँग्रेस खासदार साहू काळ्या पैशाने होते व्यथित

छत्तीसगडमधील काँग्रेस खासदार धीरज साहू हे गेल्या काही दिवसांपासून चांगलेच चर्चेत आहेत. खासदार धीरज प्रसाद साहू आणि त्यांच्या निकटवर्तीयांच्या मालमत्तांवर आयकर विभागाने छापे टाकून कोट्यवधींची रोकड जप्त केली आहे. त्यांच्याकडे साडेतीनशे कोटी रुपये सापडल्याची माहिती आहे. अशातच धीरज साहू यांचं एक जुनं ट्वीट व्हायरल झालं आहे.

धीरज साहू यांनी हे ट्वीट १२ ऑगस्ट २०२२ रोजी केलं होतं. त्यात ते म्हणाले होते की, “नोटबंदीनंतर देशात एवढा काळा पैसा आणि भ्रष्टाचार आहे की ते बघून मन व्यथित होतं. लोक एवढा पैसा नेमका आणतात कुठून, हे माझ्या लक्षातच येत नाही. या देशामध्ये जर कोणी भ्रष्टाचाराला आळा घालणार असेल तर तो फक्त काँग्रेस पक्ष आहे.” असं ट्वीट साहू यांनी केलं होतं. व्हायरल ट्वीटच्या सत्यतेबाबत खात्री होऊ शकलेली नाही. त्यांनी केलेल्या या ट्वीटचा स्क्रीनशॉट सर्वत्र व्हायरल झाला आहे. त्यांच्या या भूमिकेवर आणि सध्या त्यांच्याकडे सापडलेलं घबाड पाहून ही दुटप्पी भूमिका असल्याचं बोललं जात आहे.

काँग्रेस खासदार धीरज साहू यांच्या कुटुंबियांच्या मालकीच्या असलेल्या ओडिशा येथील डिस्टिलरी कंपनीविरोधात आयकर विभागाने मोहीम उघडली आहे. साहू यांचं घर आणि त्यांच्याशी संबंधित इतर ठिकाणांवर मागील पाच दिवसांपासून तपास सुरु आहे. आतापर्यंत तब्बल ३५१ कोटी रुपये अधिकाऱ्यांना सापडलेले आहेत.

हे ही वाचा:

महाराष्ट्रात ISIS विरोधात NIA ची कारवाई, साकीब नाचनला अटक

अमेरिकेत भारतवंशी जाणून घेणार राम मंदिराचा संघर्ष

गाझामध्ये युद्धबंदीची मागणी करणाऱ्या संयुक्त राष्ट्रांच्या ठरावाविरोधात अमेरिकेकडून नकाराधिकार

आठ हजार कोटी चार महिन्यात खर्च कसे करायचे?

६ डिसेंबरपासून साहू यांच्या घरावर छापेमारी सुरु केलेली आहे. साहू यांच्यावर चोरी आणि ‘ऑफ द बुक’ देवाण-घेवाणीचा आरोप आहे. या छापेमारीसाठी ८० लोकांच्या ९ टीम कार्यरत आहेत. छापेमारीच्या दरम्यान जेव्हा १० कपटांमध्ये नोटा सापडल्या तेव्हा सुरक्षा रक्षक, ड्रायव्हर आणि इतर कर्मचाऱ्यांसह २०० अधिकाऱ्यांची आणखी एक टीम तपासात सहभागी झाली. पैसे मोजता मोजता काही मशीन्सही बंद पडल्या होत्या. याशिवाय दिवस- रात्र हे पैसे मोजणीचे काम सुरू होते.

Exit mobile version