काश्मीरमध्ये होत असलेल्या मुस्लिमेतरांच्या हत्या, सैनिकांचे बलिदान आणि बांगलादेशातील हिंदुंवरील अत्याचार या सर्व घटना एकमेकांशी जोडत काँग्रेसचे खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री मनिष तिवारी यांनी रविवारी (१७ ऑक्टोबर) एक ट्विट केले आहे. दक्षिण आशियात एक मोठा इस्लामिक अजेंडा काम करत असल्याचे म्हणत त्यांनी प्रश्न उपस्थित केला आहे.
‘काश्मीरमधील मुस्लिमेतरांच्या हत्या, बांगलादेशातील हिंदूंच्या हत्या आणि पुंछमधील नऊ जवानांचे हौतात्म्य यात काही संबंध आहे का? कदाचित, दक्षिण आशियात एक मोठा इस्लामिक अजेंडा काम करत आहे,’ असे त्यानी ट्विटमध्ये म्हटले आहे.
Is there a link between killing of Non Muslims in Kashmir,Hindus in Bangladesh &massive infiltration in Poonch leaving nine Jawans dead?
Perhaps so.A larger Pan Islamist agenda is at work in South Asia https://t.co/YiDAlu334Thttps://t.co/NQeaPB08fmhttps://t.co/w7Yi8ucQac
— Manish Tewari (@ManishTewari) October 17, 2021
काश्मीरमध्ये पुन्हा एकदा दहशतवाद्यांनी आपली दहशत निर्माण करण्यासाठी सामान्य नागरिकांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. दहशतवाद्यांनी पाच दिवसांमध्ये तब्बल सात नागरिकांची हत्या केली आहे. त्यानंतर सुरक्षादलाच्या जवानांनी दहशतवाद्यांविरुद्ध मोहीम सुरू केली आहे.
हे ही वाचा:
भारतातील बैठकीसाठी पाकिस्तानलाही दिले निमंत्रण
जागतिक बँक भारताच्या लसीकरणाबद्दल हे म्हणाली….
‘काँग्रेस पक्षाची अवस्था ही सर्कससारखी झाली आहे’
जम्मू- काश्मीरमध्ये दहशतवादविरोधी ऑपरेशनमध्ये नऊ जवान शहीद झाले आहेत. गेल्या आठवड्यात दहशतवाद्यांबरोबर झालेल्या चकमकीत पाच जवानांना वीरमरण आले होते. त्यानंतरही एका चकमकी दरम्यान दोन जवानांना वीरमरण आले होते. बांगलादेशातही हिंदुंवर मोठ्या प्रमाणात अत्याचार होत आहेत. हिंदू आणि हिंदू मंदिरांना लक्ष्य केले जात असून मंदिरांची तोडफोड केली जात आहे. भाविकांना मारहाण केली जात आहे. दुर्गापूजेच्या मंडपांवर हल्ले केले गेले. इस्कॉन मंदिरावर हल्ला करून भाविकांनाही मारहाण केल्याची घटना घडली.