अमरिंदरसिंग यांच्या पत्नींना काँग्रेस पक्षाने दिला डच्चू

पक्षविरोधी कारवायांमध्ये सहभागी असल्याचा आरोप

अमरिंदरसिंग यांच्या पत्नींना काँग्रेस पक्षाने दिला डच्चू

कॅप्टन अमरिंदर यांच्या पत्नी आणि पतियाळा लोकसभा खासदार प्रणित कौर यांना काँग्रेस पक्षाने निलंबित केले आहे. माजी मुख्यमंत्री आणि पंजाब काँग्रेसचे प्रमुख असलेले कॅप्टन अमरिंदर सिंग आणि त्यांच्या पत्नीने भाजप पक्षाला मदत केल्याच्या आरोपा वरून त्यांना पक्षातून निलंबित केले आहे.

पक्षाने त्यांना निलंबित करून त्यांच्यावर नोटीस बजावली आहे. शिवाय या नोटिसीला त्यांना तीन दिवसात उत्तर देण्याचे आदेशही दिले आहेत. गेल्या वर्षी माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग त्यांचा मुलगा राणिंदर सिंग , मुलगी जय इंदर कौर आणि नातू निरावान सिंग यांनी भाजप पक्षात प्रवेश केला आहे.

अमरिंदर सिंग आता भारतीय जनता पक्षात आहेत. शिस्तपालन कृती समितीचे सदस्य सचिव तारिक अन्वर यांनी जारी केलेल्या पत्रात त्यांनी म्हण्टले आहे कि , पंजाब प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अमरिंदर सिंग राजा वारिंग यांनी तक्रार कलेची होती कि कौर या भाजप पक्षाला मदत करण्याच्या उद्देशाने पक्षाच्या विरोधात जाऊन कारवाया करत आहेत. पक्षाच्या इतरही काही नेत्यांनी त्यांच्या अशाच तक्रारी केल्या होत्या असेही त्या पात्रात नमूद केले आहे. त्यांची तक्रार हि आवश्यक कारवाईसाठी शिस्तपालन समितीकडे पाठवण्यात आली आहे.

हे ही वाचा:

माझ्या हत्येचा कट  रचला जात आहे

आमदार संतोष बांगर यांच्यावर गुन्हा दाखल

इंग्रजी राजवटीचा पाय खिळखिळा करणारा “लाल”

हवाई अभ्यासच्यावेळी सुखोई – मिराज विमाने हवेत धडक

कोण आहेत अमरिंदर सिंग?

पंजाबच्या मुख्यमंत्री पदावरून गेल्यानंतर नवज्योत सिंग सिद्धू यांच्याशी झालेल्या मतभेदामुळे सप्टेंबर २०२१ साली त्यांनी काँग्रेस पक्ष सोडला. त्यानंतर २०२२ साली सिंग यांनी पंजाब लोक काँग्रेस हा स्वतःचा पक्ष स्थापन करून पंजाब विधानसभा निवडणुकीत एक सुद्धा जागा जिंकू शकला नाही. पटियाला अर्बनच्या त्यांच्या स्वतःच्याच मतदारसंघात ते स्वतः पराभूत झाले त्यानंतर काही महिन्यांनी अमरिंदर सिंग यांनी भाजप मध्ये प्रवेश कला आणि पंजाब लोक काँग्रेस आपोआपच त्यात विलीन झाले.

Exit mobile version