24 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरराजकारणकाँग्रेसच्या नसीम खान यांनी लांडेंविरोधात केलेल्या याचिकेत उद्धव ठाकरेंचाही उल्लेख

काँग्रेसच्या नसीम खान यांनी लांडेंविरोधात केलेल्या याचिकेत उद्धव ठाकरेंचाही उल्लेख

Google News Follow

Related

सत्तेत तीन पक्ष एकत्र आले असले तरी यांच्या परस्परांविरोधातील कुरघोडी काही थांबता थांबत नाहीत. शिवसेना आमदार दिलीप लांडे यांच्याविरोधात काँग्रेस नेते नसीम खान यांनी मुंबई उच्च न्यायालयात निवडणूक याचिका दाखल केली आहे.

त्यावर पार पडलेल्या सुनावणीदरम्यान आपली बाजू प्रतिज्ञापत्रावर मांडण्यासाठी दिलीप लांडे यांनी वाढीव वेळ मागितला. त्याची दखल न्यायालयाने त्यांना तीन आठवड्यांचा अवधी दिला. सदर याचिकेवर शुक्रवारी न्या. संदीप शिंदे यांच्यासमोर सुनावणी पार पडली. तेव्हा, लांडे यांनी आपली बाजू मांडण्यासाठी न्यायालयाकडे वेळ मागितला. त्याची दखल घेत न्यायालयाने त्यांना तीन आठवड्यांचा कालावधी देत सुनावणी चार आठवड्यांसाठी तहकूब केली.

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत नसीम खान यांचा शिवसेनेचे उमेदवार दिलीप लांडे यांनी चांदिवली विधानसभा मतदार संघातून एकमेकांविरोधात निवडणूक लढवली होती. यामध्ये दिलीप लांडे यांनी नसीम खान यांचा अवघ्या ४०९ मतांनी पराभव केला होता. प्रचारादरम्यान २० ऑक्टोबर २०१९ रोजी म्हणजेच मतदानाच्या आदल्या दिवशी शिवसेना कार्याध्यक्ष आणि विद्यमान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सध्याचे परिवहन मंत्री अनिल परब आणि अभिनेता मिलिंद गुणाजी यांच्यासोबत निवडणूक आयोगाकडून निश्चित करण्यात आलेल्या कालावधीपेक्षा अधिककाळ प्रचार केला होता. असा आरोप करणारी याचिका नसीम खान यांनी उच्च न्यायालयात दाखल केली आहे. त्यामुळे लांडे आणि नसीम खान यांच्यातील वाद आता जगजाहीर झालेला आहे. तसेच या निवडणूक प्रचारात आपण ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा दिल्याची खोटी चित्रफितही विरोधकांनी समाजमाध्यमाद्वारे पसरवला, असा आरोप नसीम खान यांनी याचिकेतून केला आहे.

हे ही वाचा:

उड्डाणपूल झाले खड्ड्यांनी बेजार

नाटकाचा पडदा उघडण्यासाठी रंगकर्मी करणार नटराजाची आरती

काँग्रेसला स्वतःचेच मुख्यमंत्री डोईजड?

कोरोनामुळे ऍथलीट्सवर २०० रुपयांऐवजी १०२५ रुपयांचा भार

खान यांनी लांडे यांच्याविरोधात निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रारही दाखल केली होती. परंतु निवडणूक आयोगाने तक्रारीकडे दुर्लक्ष केल्याचे त्यांनी म्हटले आहे. निवडणूक आयोगाने प्रचारासाठी दिलेल्या मुदतीनंतरही ठाकरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांना लांडे यांच्यासाठी केलेल्या बेकायदा प्रचारामुळे आपला अवघ्या काही मतांनी पराभव झाल्याचा दावाही खान यांनी या याचिकेतून केला आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा