कॉंग्रेसच्या तीन आमदारांकडे सापडली ५० लाखांची रोकड

कॉंग्रेसच्या तीन आमदारांकडे सापडली ५० लाखांची रोकड

शिक्षक भरती घोटाळ्याप्रकरणी ईडीने पुन्हा एकदा कोलकत्यातील तीन ठिकाणी छापे टाकत अर्पिता मुखर्जी घरातून सुमारे ५० कोटी रुपयांची रोकड जप्त केल्याचे प्रकरण ताजे असतानाच आता आणखी एक प्रकरण समोर आलं आहे, आमदार इरफान अन्सारी यांच्यासह झारखंडच्या तीन काँग्रेस आमदारांना ५० लाख रूपयांच्या काळ्यापैशासह ताब्यात घेतलं आहे. पश्चिम बंगालच्या ग्रामीण हावडा पोलिसांनी ही कारवाई केली आहे. पोलिस या आमदारांची कसून चौकशी करत असून हे तिन्ही कॉंग्रेस आमदार एकाच कारमधून प्रवास करीत होते अशी माहिती मिळत आहे.

हावडा पोलिसांनी इरफान अन्सारी यांच्यासह नमद विक्सल कोंगाडी आणि राजेश कश्यप या तीन कॉंग्रेस आमदारांहच्या जवळ मोठी रोकड सापडल्याप्रकरणी ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी करत आहे. हे तिन्ही कॉंग्रेस आमदार एकाच कारमधून पूर्व मिदनापूरच्या दिशेने जात होते. शनिवारी रात्री उशीरा त्यांच्या कारला पांचला ठाण्याच्या अंतर्गत असलेल्या रानीहाटीच्या वळणावर रोखण्यात आले आणि गाडीची कसून तपासणी करण्यात आली. त्यावेळी या कारमध्ये मोठी रोकड ठेवण्यात आली असल्याचे पोलिसांना आढळून आहे. त्यानंतर आता काऊंटिंग मशिनच्या मदतीने ही रोकड मोजण्यासाठी बँक अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्यात येत असल्याचे कळते.

एकाच कारमध्ये होते झारखंडचे तीन कॉंग्रेस आमदार

घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक स्वाती भंगालिया घटनास्थळी दाखल झाल्या. त्यांनी सांगितले की, गुप्त माहितीच्या आधारे राणीहाटी मोर येथे विशेष तपासणी मोहीम राबवण्यात आली. दरम्यान, झारखंडमधील जामतारा येथून येणारे एक वाहन थांबविण्यात आले. कारमध्ये चालकासह पाच जण होते. यामध्ये झारखंडमधील काँग्रेसचे तीन आमदार इरफान अन्सारी, राजेश कछाप आणि नमन विक्सल कोंगडी यांचा समावेश होता. या काळात मोठ्या प्रमाणात रोकड जप्त करण्यात आली आहे. त्यांना ताब्यात घेऊन चौकशी करण्यात येत आहे.

मिराबाई चानूने राष्ट्रकुल स्पर्धेत ‘उचलले सोने’

अविनाश भोसलेचे ‘हेलिकॉप्टर’ सीबीआयने आणले जमिनीवर

तिस्ता सेटलवाड आणि श्रीकुमार यांना दिलासा नाहीच

यंदा राखी खरेदीसाठी बहिणींना मोजावे लागणार ज्यादा पैसे

काऊंटिंग मशिनने करणार मोजणी

पोलिस अधीक्षक स्वाती भंगालिया यांनी सांगितले की, वाहनात बेहिशेबी रोकड सापडली आहे. ते म्हणाले की, सध्या किती रोकड आहे हे सांगता येणार नाही. बँक अधिकाऱ्यांशी संपर्क साधला जात आहे. मोजणी यंत्राद्वारे रोख मोजली जाईल. आमदारांची चौकशी सुरू असल्याचे ते म्हणाले. गाडीवर जामतारा आमदाराचा फलक लावण्यात आला होता. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

कार इरफान अन्सारी यांच्या मालकीची

इरफान अन्सारी हे खारखंडमधील जमतारा मतदार संघाचे राजेश कच्छप हे रांची जिल्ह्यातील खिजरी मतदार संघाचे तर नमन कोंगारी हे सिमडेगा जिल्ह्यातील कोलेबिरा मतदार संघाचे आमदार आहेत. जप्त करण्यात आलेली कार ही आमदार इरफान अन्सारी यांची असल्याचे समजते. झारखंडची सीमा पश्चिम बंगालच्या जवळ असून जामतारा हा राज्याचा सर्वात जवळचा मतदारसंघ आहे. राज्यात झार खंड मूक्ती मोर्चा आणि कॉंग्रेस यांच्या युतीची सत्ता आहे.

Exit mobile version