दारुच्या नशेत धुंद होऊन गाडी चालवणाऱ्या एका तरुणासाठी काँग्रेसच्या आमदार मैदानात उतरल्याचा अजब प्रकार राजस्थान मध्ये पाहिला मिळाला आहे. ड्रंक अँड ड्राइव्ह अर्थात दारू पिऊन गाडी चालवणे. या गुन्ह्या अंतर्गत पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या एका तरुणाच्या सुटकेसाठी राजस्थानमधील काँग्रेस आमदार मीना कंवर या पुढे सरसावले आहेत. या मद्यपी तरुणाच्या सुटकेसाठी आमदार कवर यांनी पोलीस स्टेशन मध्येच ठिय्या आंदोलनाला सुरुवात केली. तर त्या मुलाचा दारू पिण्याची वकिली करतानाही त्या दिसल्या.
राजस्थानमधील जोधपूर येथे हा सारा प्रकार घडला आहे. दारू पिऊन गाडी चालवणाऱ्या एका तरुणाचे पोलिसांनी कायदेशीररित्या चलान कापले. यावरूनच या सर्व राड्याला सुरुवात झाली. हा तरुण काँग्रेसच्या शेरगड विधानसभेचे आमदार मीना कंवर यांचा नातेवाईक असल्याची प्राथमिक माहिती पुढे येत आहे. यावरूनच मीना कंवर आणि त्यांचे पती माजी आमदार उमेद सिंह यांनी पोलीस स्टेशन गाठले आणि पोलिसांसोबत हुज्जत घालू लागले.
हे ही वाचा:
‘बांगलादेशी हिंदूंचे रक्षण आणि पुनर्वसन करा!’ काँग्रेस नेत्याची मागणी
मंदाकिनी खडसे ईडी समोर आज राहणार हजर
आर्यन खानच्या सुटकेसाठी शिवसेना नेत्याची धडपड!
म्हाडासाठी अर्ज करताय? मग तुम्ही मांसाहारी की शाकाहारी ते सांगा
यावेळी मीना कंवर यांनी चक्क दारू पिण्याचे समर्थन केलेले दिसत आहे. “बच्चे है पार्टी, करते है, पी लेते है…उस मे क्या है?” असे मीना कंवर म्हणताना दिसत आहेत तर त्या आणि त्यांचे पती दोघेही पोलीस स्टेशनमध्ये धरणे देतानाही दिसून आले. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियामध्ये व्हायरल झाला असून काँग्रेस पक्षावर चांगलीच टीका होताना दिसत आहे.