काँग्रेस नेते मनीष तिवारी यांनी अग्निपथ योजनचे केले समर्थन

काँग्रेस नेते मनीष तिवारी यांनी अग्निपथ योजनचे केले समर्थन

केंद्र सरकारने अग्निपथ योजना युवकांसाठी आणली होती. त्यावरून देशात आंदोलन, मोर्चे सुरु आहेत. काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी या योजनेला विरोध केला आहे. मात्र काँग्रेसच्या एका खासदाराने पक्षाच्या पलीकडे जाऊन सरकारच्या या निर्णयाचे समर्थन केले आहे. काँग्रेस खासदार मनीष तिवारी यांनी ट्विट केले आहे. भारत सरकारच्या सशस्त्र दलांकडे रोजगाराची हमी म्हणून पाहिले जाऊ नये, असे त्यांनी ट्विट केले आहे.

अग्निपथ योजना ही एक अत्यंत आवश्यक सुधारणा आहे. आज देशाला तरुण सशस्त्र दलांची गरज आहे ज्यात कमी मनुष्यबळाची गुंतवणूक करताना अत्याधुनिक शस्त्रास्त्र तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. भारत सरकारच्या सशस्त्र दलांकडे रोजगाराची हमी म्हणून पाहिले जाऊ नये, असे ट्विट मनीष तिवारी यांनी केले आहे.

अग्निपथ योजनेची घोषणा झाल्यानंतर देशात अनेक ठिकाणी आंदोलने झाली. बिहारमध्ये याचा जास्त प्रभाव पडला. तिथे अनेक ठिकाणी जाळपोळ करण्यात आली. तरुणांना भडकवले जात असल्याचे भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितले आहे. त्यांनी हेही सांगितले की, असे तरुणांना भडकवल्यास याचा परिणाम तरुणांच्या नोकरीवर होऊ शकतो.

हे ही वाचा:

दाऊदच्या गँगकडून साध्वी ठाकूर यांना धमकीचा फोन

‘अग्निपथ योजने’संबंधी गृहमंत्रालयाने घेतला ‘हा’ महत्त्वाचा निर्णय

काश्मीरमध्ये पोलिस निरीक्षकाची गोळ्या घालून हत्या

१०० व्या वाढदिवसानिमित्त पंतप्रधान मोदींनी घेतली आईची भेट

दरम्यान, अनेक दशके जुन्या संरक्षण भरती प्रक्रियेत आमूलाग्र बदल करत लष्कर, नौदल आणि हवाई दलातील सैनिकांच्या भरतीसाठी केंद्र सरकारने मंगळवार, १४ जून रोजी ‘अग्निपथ’ योजना जाहीर केली. त्याअंतर्गत चार वर्षांच्या कालावधीसाठी सैनिकांची भरती केली जाणार आहे. या योजनेंतर्गत या वर्षी तिन्ही सेवांमध्ये सुमारे ४६ हजार सैनिकांची भरती करण्यात येणार आहे. निवडीसाठी पात्रता वय १७ ते २३ वर्षे दरम्यान असेल आणि त्यांना ‘अग्निवीर’ असे नाव देण्यात आले आहे.

Exit mobile version