लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जागा वाटप झाल्यानंतरगी अद्याप महाविकास आघाडीत धुसफूस सुरू आहे. सांगलीच्या जागेवरून अजुनही नाराजी नाट्य सुरू असून काँग्रेस नेते विशाल पाटील यांच्यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांकडून शक्तिप्रदर्शन करण्यात आले आहे. याशिवाय काँग्रेस नेते विशाल पाटील यांनी निवडणुकीत २ उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
काँग्रेसच्या कार्यकर्त्यांशी संवाद विशाल पाटील यांनी मतदारसंघात उमेदवारी अर्ज भरला आहे. सांगलीबाबत काँग्रेस पक्ष आणि महाविकास आघाडीने खूप मोठी चूक केली असं विधान सांगलीचे इच्छुक उमेदवार विशाल पाटील यांनी केले आहे. सांगलीत काँग्रेस कार्यकर्ते शक्तिप्रदर्शन करत असताना विशाल पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला.
यावेळी विशाल पाटील म्हणाले की, “जिल्ह्यातील कार्यकर्त्यांशी संवाद साधल्यानंतर आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर अर्ज भरला पाहिजे असा सर्वत्र सूर होता. पण, काँग्रेस पक्ष आणि महाविकास आघाडीने खूप मोठी चूक केली. भाजपाला हरवायचं असेल तर इथं सक्षम उमेदवार द्यायला हवा होता असं म्हणत कार्यकर्त्यांनी आपण अर्ज भरून पक्षाकडे मागणी करावी असं म्हटलं. ३८ हजार काँग्रेस कार्यकर्त्यांसोबत आम्ही चर्चा केली. त्याचाच भाग म्हणून निवडणुकीत अर्ज भरले आहेत,” असं विशाल पाटील म्हणाले.
हे ही वाचा:
इस्रायलने प्रत्युत्तर दिल्यास.. कधीही न वापरलेलं शस्त्र बाहेर काढू!
दिनेश कार्तिकच्या ८३ धावा ठरल्या अपुऱ्या
‘निवडणूक रोखे मागे घेतल्याने प्रत्येकाला पश्चात्ताप होईल’
सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार करणाऱ्यांना गुजरातमधून अटक
सांगली जिल्ह्याचा आमदार म्हणून सातत्याने प्रामाणिक प्रयत्न केले आहे. सांगली जिल्ह्याची जागा काँग्रेसला मिळावी त्यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत आम्ही प्रयत्न केला. पण जी सांगलीची परिस्थिती सध्या उद्भवली आहे त्याला सगळे आपण साक्षीदार आहोत. महाराष्ट्रात महाविकास आघाडी करीता अत्यंत चांगलं वातावरण आहे. यासाठी काय निर्णय घ्यायचे ते ज्येष्ठांनी ठरवावं असं विश्वजित कदम यांनी म्हटलं आहे. सांगलीतून महाविकास आघाडीने ठाकरे गटाच्या चंद्रहार पाटलांना उमेदवारी दिल्यामुळे स्थानिक काँग्रेस कार्यकर्ते नाराज आहेत.