“राज्यातलं काँग्रेस नेतृत्व खूप कमकुवत झालंय”

काँग्रेसचे माजी वरिष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची काँग्रेसवर खोचक टीका

“राज्यातलं काँग्रेस नेतृत्व खूप कमकुवत झालंय”

लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजल्यानंतर आता जागावाटपाच्या मुद्द्यावरही तोडगा निघताना दिसत आहे. दुसरीकडे सर्व पक्षांनी निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात केली आहे. दरम्यान, महाराष्ट्रातही महाविकास आघाडीतलं जागावाटप झालं असून त्याची घोषणा मंगळवार, ९ एप्रिल रोजी करण्यात आली आहे.

दरम्यान, काँग्रेसचे माजी वरिष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनीही काँग्रेसच्या राज्यातल्या नेतृत्वावर निशाणा साधला आहे. सांगली आणि भिवंडीची जागा काँग्रेसला मिळाली नसल्यामुळे अशोक चव्हाण यांनी राज्यातल्या काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांना टोला लगावला आहे. “काँग्रेसकडे नेतृत्वाचा आभाव आहे. राज्यात काँग्रेसला केवळ १७ जागा मिळाल्या आहेत. काँग्रेसची इतकी केविलवाणी परिस्थिती यापूर्वी कधीच झाली नव्हती. राज्यातलं कॉंग्रेसचं नेतृत्व खूप कमकुवत झालं आहे. काँग्रेसच्या हक्काच्या जागा त्यांना मिळाल्या नाहीत. काँग्रेसला त्यांच्या पारंपरिक सांगली आणि भिवंडीच्या जागा सोडाव्या लागतात, यातून पक्षाचं नेतृत्व किती कमकुवत झालंय हे सिद्ध होतं. महाविकास आघाडीत अवघ्या १७ जागांवर काँग्रेसची बोळवण होतेय, हे त्यांच्यासाठी वाईट चित्र आहे,” अशी खोचक टीका अशोक चव्हाण यांनी केली आहे.

हे ही वाचा:

प्रेमप्रकरणे, प्रेमविवाहाचे धोके सांगण्यासाठी केरळमध्ये दाखवला ‘द केरळ स्टोरी’

काँग्रेसची गळती कायम ; प्रवक्ते राजू वाघमारे यांचा शिवसेना प्रवेश

‘अरुणाचल प्रदेश हा भारताचा अविभाज्य भाग आहे, होता आणि राहील’

‘अनिल मसिह यांना विचारू, असे का केले?’

महाविकास आघाडीत जागावाटपावरून बिघाडी झाली होती मात्र आता अंतिम यादीनंतरही ही बिघाडी कायम असल्याचे बोलले जात आहे. सांगली आणि भिवंडी लोकसभेच्या जागेवरून वाद होता. या दोन्ही जागा गेल्या अनेक वर्षांपासून काँग्रेसच्या ताब्यात आहेत. मात्र महाविकास आघाडीत ठाकरे गटानं सांगलीच्या जागेवर दावा करत चंद्रहार पाटील यांना उमेदवारी दिली. तर भिवंडी लोकसभेच्या जागेवर शरदचंद्र पवार गटाने सुरेश उर्फ बाळ्यामामा म्हात्रे यांना उमेदवारी दिली. यामुळे स्थानिक काँग्रेसच्या नेतृत्वाने नाराजी व्यक्त केली आहे. शिवाय राज्यातल्या काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांवरही टीका होत आहे.

Exit mobile version