25 C
Mumbai
Friday, December 27, 2024
घरराजकारणपटोले, दलवाईंनंतर सातवही राऊतांच्या विरोधात, काँग्रेस नेते सेनेवर नाराज?

पटोले, दलवाईंनंतर सातवही राऊतांच्या विरोधात, काँग्रेस नेते सेनेवर नाराज?

Google News Follow

Related

एकीकडे काँग्रेस अध्यक्षपदावर राहुल गांधींच्या पुनरागमनासाठी काँग्रेस उत्सुक असताना दुसरीकडे खासदार संजय राऊत यूपीए अध्यक्षपदासाठी शरद पवार यांच्या नावाची मागणी सातत्यानं पुढे आणत आहेत. संजय राऊतांनी पुन्हा एकदा याबाबत वक्तव्य केल्यानंतर त्यावर काँग्रेसच्या गोटातून देखील जोरदार प्रतिक्रिया आल्या आहेत. कॉंग्रेस खासदार राजीव सातव यांनी देखील या संदर्भात ट्वीट केले आहे. “बाहेरच्या मंडळींनी आधी यूपीएत यावं, मग मतांची दखल घेऊ”, असा टोला सातव यांनी संजय राऊतांना दिला आहे.

कॉंग्रेस खासदार राजीव सातव म्हणाले, सध्या महाराष्ट्रात काही नाजूक प्रश्न आहेत.काँग्रेस पक्ष राज्यात समजूतदारपणाने प्रश्न सोडवण्यासाठी सहकार्य करत आहे. बाकी,  युपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी आहेत आणि त्याच राहतील. बाहेरच्या मंडळींनी युपीएमध्ये प्रवेश घेतला की त्यांच्या मतांची योग्य ती दखल घेऊ.

हे ही वाचा:

संजय राऊतांचे युपीए २ चे इमले

संजय राऊत हे शरद पवार यांचे प्रवक्ते आहेत का?- नाना पटोले

निर्लज्ज राहुल गांधी महिला- बुजुर्ग सन्मानाच्या बाता मारतायत

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करा

काँग्रेसमध्ये पवारांच्या नावावरुन नाराजी नाही. उलट काँग्रेसचे काही लोकच अशी इच्छा व्यक्त करतात.  यूपीए बळकट व्हायला हवी अशी त्यांचीही इच्छा आहे असं राऊत म्हणाले .पण त्यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले, संजय राऊतांनी आता या विषयावर बोलणं बंद करावं. आणि आता खासदार  राजीव सातव यांनी देखील संजय राऊतांना टोला दिला आहे.

याशिवाय काँग्रेस नेते हुसेन दलवाई यांनी संजय राऊतांचे विधान हास्यास्पद असल्याचे सांगितले होते. परंतु तरीही आज संजय राऊतांनी पुन्हा तोच सूर आळवलाआहे. शिवाय त्यावर भर देत युपीए २ चे पिल्लूही सोडून दिले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
217,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा