पटोले म्हणतात, श्रीराम आणि राहुल यांच्या नावात ‘आर’

राजस्थानच्या मंत्र्यांनीही रामाची तुलना केली राहुल यांच्याशी

पटोले म्हणतात, श्रीराम आणि राहुल यांच्या नावात ‘आर’

महाराष्ट्रातील काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राहुल गांधी हे देखील प्रभू श्रीराम, शंकराचार्य यांच्यानंतर देशभर पदयात्रा करणारे तिसरे व्यक्ती आहेत, असे वक्तव्य केले होते. आता तर त्यांनी राहुल गांधी आणि श्रीराम यांच्या नावात ‘आर’ असल्याचा साक्षात्कार झाला आहे. त्याची आता सर्वत्र चर्चा आहे.

त्यात भर पडली आहे ती राजस्थानच्या आरोग्य मंत्र्याची. राजस्थानमध्ये काँग्रेसचे सरकार आहे. तिकडचे आरोग्यमंत्री परसादी लाल मीणा यांनी हद्द केली आहे. ते म्हणाले की, काँग्रेस नेते राहुल गांधी तर श्रीरामापेक्षाही जास्त पायी अंतर कापतील.

नाना पटोले म्हणाले होते की, प्रभू श्रीरामाने कन्याकुमारी ते काश्मीर अशी पदयात्रा केली होती. आता राहुल गांधीही पदयात्रा करत आहेत. या पदयात्रेत लोक त्यांच्याशी संवाद साधत आहेत. योगायोगाची गोष्ट म्हणजे प्रभू श्रीराम आणि राहुल गांधी यांच्या नावातील पहिले अक्षर ‘आर’ आहे. पण आम्ही राहुल गांधी यांची तुलना प्रभू श्रीरामाशी करत नाही. राहुल गांधी हे मानवतेसाठी काम करत आहेत.

राहुल गांधी यांची ही पदयात्रा १५० दिवस चालणार असून साडेतीन हजार किलोमीटरचा टप्पा ते या यात्रेदरम्यान पूर्ण करणार आहेत. या यात्रेच्या ४१व्या दिवशी राहुल गांधी यांनी कुरनूल येथील हलहरवी बस स्टॉपपासून सुरुवात केली.

महाराष्ट्रात आता ही यात्रा येणार असून त्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार सहभागी होणार असल्याचे कळते.

हे ही वाचा:

“वैभव नाईक पैसे जमवणार तर चौकशी होणारच”

पूजा चव्हाणसाठी मी लढत असताना भास्करशेठ तुम्ही कुठल्या बिळात लपला होतात?

रॉजर बिन्नी बीसीसीआयचे नवे अध्यक्ष

येरवडा कारागृहातील कैदी जगात हुशार

दरम्यान, काँग्रेस नेत्यांच्या या विधानावर भाजपाने तीव्र आक्षेप घेतला आहे. भाजपा नेते राजेंद्र राठोड म्हणाले की, राहुल गांधी यांचा श्रीरामासह अपमान करून आमच्या संस्कृतीचा अपमान केला जात आहे. या लोकांनी गांधी घराण्याची खुशामत करण्याच्या सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत.

Exit mobile version