“राहुलला शिक्षा ठोठावणाऱ्या जजची जीभ कापू”

तामिळनाडुच्या डिंडीगुल येथील सभेत दिली धमकी

“राहुलला शिक्षा ठोठावणाऱ्या जजची जीभ कापू”

काँग्रेस नेते राहुल गांधी यांना २ वर्षाची शिक्षा ठोठावणारे सूरत येथील महानगर दंडाधिकारी एच.एच. वर्मा यांना जीभ कापण्याची धमकी देण्यात आलीय. तामिळनाडू काँग्रेसच्या अनुसूचित जाती-जामाती मोर्चाचे जिल्हा प्रमुख मणिकंदन यांनी शुक्रवारी राज्यातील डिंडीगुल येथील सभेत ही धमकी दिलीय.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी २०१९ मध्ये लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान कर्नाटक येथे आयोजित सभेत “सर्व चोरांचे आडनाव मोदी कसे” अशी टीका केली होती. याविरोधात गुजरातमधील भाजपचे माजी आमदार पुर्णेश मोदी यांनी कोर्टात केस केली होती. याप्रकरणी २३ मार्च २०२३ रोजी सूरतच्या महानगर दंडाधिकारी कोर्टातील न्यायाधीश एच.एच. वर्मा यांनी राहुल गांधींना २ वर्षाच्या कारावासाची शिक्षा ठोठावली. त्यानंतर लोकसभा सचिवालय समितीने राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केली. तेव्हापासून काँग्रेस देशात विविध ठिकाणी आंदोलन करीत आहे.

हे ही वाचा:

भारत-श्रीलंका तस्करी प्रकरणी चेन्नईत एनआयएची छापेमारी,सोने , ८०लाखांची रोकड जप्त

हुगळीत धावणार देशातील पहिली पाण्याखालून जाणारी मेट्रो

दिल्लीवरून डेहराडूनला जा फक्त २ तासांत

शरद पवार म्हणाले….मोदी-अदानी मुद्द्यावर संयुक्त संसदीय समिती उपयोगाची नाही?

तामिळनाडूच्या डिंडीगुल येथे शुक्रवारी आयोजित निषेध मोर्चात तामिळनाडू काँग्रेसच्या अनुसूचित जाती-जमाती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष मणिकंदन यांनी राहुल गांधी यांना शिक्षा ठोठावणारे महानगर दंडाधिकारी एच.एच. वर्मा यांची जीभ कापण्याची धमकी दिली. याप्रकरणी काँग्रेस नेते मणिकंदन यांच्या विरोधात तामिळनाडू पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय.

 

डिंडीगुल येथे ७ एप्रिल रोजी आयोजित निषेध मोर्चात मणिकंदन म्हणाले की, “सूरज कोर्टाच्या न्यायधीशांनी २३ मार्च रोजी आमचे नेते राहुल गांधी यांना २ वर्षाची शिक्षा ठोठावली आहे. न्या. एच.एच वर्मा यांनी लक्षात ठेवावे जेव्हा काँग्रेस सत्तेत येईल तेव्हा आम्ही तुमची जीभ कापून टाकू” या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर पोलिसांनी मणिकंदन यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केलाय. दरम्यान अजूनपर्यंत मणिकंदन यांना अटक करण्यात आलेली नाही.

Exit mobile version