30 C
Mumbai
Wednesday, January 1, 2025
घरराजकारणकाँग्रेस नेत्या सोनिया गांधींना केले रुग्णालयात दाखल

काँग्रेस नेत्या सोनिया गांधींना केले रुग्णालयात दाखल

सौम्य तापाची लक्षणे दिसल्यामुळे केले दाखल

Google News Follow

Related

काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांना तापाची सौम्य लक्षणे आढळल्याने त्यांना दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती स्थिर आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री त्यांची प्रकृती अचानक बिघडली. त्यांच्यामध्ये तापाची सौम्य लक्षणं आढळून आली. सध्या त्या डॉक्टरांच्या देखरेखीखाली असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

हे ही वाचा:

चीनचे अध्यक्ष जिनपिंग जी-२० परिषदेला अनुपस्थित राहणार, मग कोण येणार?

भिवंडीत दुमजली इमारत कोसळून दोघींचा मृत्यू, चौघे जखमी

अंधेरी पूर्व ते विमानतळ भूमिगत मेट्रोच्या भुयारीकरणाला प्रारंभ

‘सनातन धर्म म्हणजे मलेरिया, डेंग्यूसारखा…’

सोनिया गांधी नुकत्याच मुंबईत झालेल्या इंडियाच्या (I.N.D.I.A) बैठकीत सहभागी झाल्या होत्या. त्यावेळी त्यांच्यासोबत काँग्रेस नेते राहुल गांधीही उपस्थित होते. यापूर्वी मार्चमध्येही सोनिया गांधी यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यावेळीही त्यांना ताप येत होता. तापाच्या तक्रारीनंतर त्यांना दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर त्या बऱ्या होऊन घरी परतल्या होत्या. त्यानंतर आता पुन्हा त्यांच्यामध्ये तापाची सौम्य लक्षणं आढळली आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
218,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा