थरूर यांचा थरार, मी मोदींविरोधी नाही

स्टार प्रचारक न केल्याने थरूर यांनी सोडले मौन

थरूर यांचा थरार, मी मोदींविरोधी नाही

काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर शशी थरूर यांना बाजूला करण्यात आल्याचे चित्र दिसत आहे. प्रथम, काँग्रेस कार्यकारिणीच्या जागी मल्लिकार्जुन खर्गे यांनी स्थापन केलेल्या नवीन समितीमध्ये त्यांना स्थान देण्यात आले नाही, त्यानंतर गुजरात आणि हिमाचल प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीतील स्टार प्रचारकांच्या स्टार प्रचारकांच्या यादीतूनही त्यांना वगळण्यात आले. या सर्व घडामोडीनंतर खुद्द शशी थरूर यांनीही याबाबत मौन सोडले आहे.

मल्लिकार्जुन खरगे यांच्या कार्यकारिणीत ४७ सदस्यांना स्थान देण्यात आले आहे. ज्यामध्ये सोनिया गांधी, राहुल गांधी, मनमोहन सिंग, एके अँटनी, अभिषेक मनु सिंघवी, अजय माकन, रणदीप सुरजेवाला, दिग्विजय सिंह, अंबिका सोनी आणि हरीश रावत यांच्या नावांचा समावेश आहे. दरम्यान, वैयक्तिकरित्या मला गुजरात विधानसभा निवडणुकीत प्रचार करायचा होता, असे ते म्हणाले. मात्र स्टार प्रचारकांच्या यादीत माझा समावेश करण्यात आलेला नाही. ते पुढे म्हणाले की, पक्षाला माझी गरज नसल्याचे दिसते.

हे ही वाचा:

लाचार माजी मुख्यमंत्र्याच्या संतापाला विचारतो कोण?

न्यायमूर्ती चंद्रचूड यांनी घेतली नव्या सरन्यायाधीश पदाची शपथ

‘खोक्या’बद्दल लवकरच सुप्रिया सुळेंना नोटीस देण्याची तयारी

दिल्ली, उत्तर भारतासह नेपाळमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के

जर मी गुजरातमध्ये स्टार प्रचारकाशिवाय प्रचार केला, तर निवडणूक आयोग माझ्यावर कारवाई करू शकतो, असे ते म्हणाले. राहुल गांधी भारत जोडो यात्रेतून ब्रेक घेऊन गुजरात आणि हिमाचल प्रदेशात प्रचार करतील अशी मला आशा आहे. भाजपविरोधात लढा सुरूच ठेवणार असल्याचे त्यांनी सांगितले. पण आपण मोदीविरोधी नाहीत. मी फक्त सरकारचा निषेध करतो. मी भारताच्या विरोधातही नाही, मी पंतप्रधान मोदींचा द्वेष करत नाही असेही थरूर यांनी सांगितले. मात्र, या विधानातूनही अनेक अर्थ काढले जात आहेत. थरूर वेळोवेळी पंतप्रधान मोदी यांचे कौतुक करत असतात . ही काही पहिलीच वेळ नाही असंही बोललं जात आहे.

Exit mobile version