काँग्रेस नेते शरद रणपिसे यांचे निधन

काँग्रेस नेते शरद रणपिसे यांचे निधन

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद रणपिसे यांचे निधन झाले आहे. वयाच्या ७१ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रणपिसे हे महाराष्ट्र विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते होते. रणपिसे यांच्या जाण्याने काँग्रेसी विचारधारेचा एक सच्चा पाईक गमावल्याची भावना व्यक्त होताना दिसत आहे.

शरद रणपिसे यांना काही दिवसांपूर्वी हृदयविकाराचा झटका आला होता. तेव्हापासून रणपिसे हे पुण्यातील एका खासगी रूग्णालयात दाखल असून त्यांच्यावर उपचार सुरू होते. पण त्या उपचारांना यश आले नाही. उपचारा दरम्यानच त्यांचे निधन झाले.

हे ही वाचा:

संजयजी…आता कोणाचे थोबाड फोडायचे?

‘ऑकस’नंतर बायडन-मॅक्रॉन “मैत्रीपूर्ण” फोन

क्वाड लवकरच भारतात बनवणार एक अब्ज लसी

LIC IPO: एलआयसी आयपीओ मधून चीनी ‘कम’

काँग्रेस नेत्यांनी व्यक्त केला शोक
शरद रणपिसे यांच्या निधनाबद्दल काँग्रेस नेत्यांनी शोक व्यक्त केला आहे. काँग्रेसचे मंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे की, “काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते, विधान परिषदेतील गटनेते आ. शरदजी रणपिसे यांच्या निधनामुळे काँग्रेस विचारांवर श्रद्धा आणि निष्ठा असणारे समर्पित नेतृत्व गमावले आहे. त्यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली! आम्ही सर्व रणपिसे कुटुंबियांच्या दु:खात सहभागी आहोत.”

तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ट्विट करत असे म्हणाले की, “काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, आविधानपरिषदेचे गटनेते आ. शरद रणपिसे यांच्या निधनाने काँग्रेस पक्षाची मोठी हानी झाली असून एक अभ्यासू व्यक्तीमत्व हरपले आहे. त्यांना कॉंग्रेस पक्षातर्फे व माझ्यातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली.”

Exit mobile version