काँग्रेस नेते संजय निरुपम म्हणतात, मुंबईच्या खराब परिस्थितीला शिवसेना जबाबदार

काँग्रेस नेते संजय निरुपम म्हणतात, मुंबईच्या खराब परिस्थितीला शिवसेना जबाबदार

मुंबई महापालिकेची निवडणूक जसजशी जवळ येत आहे तसे महाविकास आघाडीतील घटक पक्ष असणारा काँग्रेस आक्रमक होताना दिसत आहे. मुंबईच्या खराब परिस्थितीला केवळ आणि केवळ शिवसेना जबाबदार आहे, असा आरोप  काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी केला आहे.

नाशिकमध्ये बोलत असताना त्यांनी हे वक्तव्य केले आहे. यावेळी त्यांनी हाच मुद्दा आगामी महापालिकेत लावून धरणार असल्याचा निर्धारही व्यक्त केला आहे. ठाणे महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये रंगलेला कलगीतुरा अख्ख्या महाराष्ट्राने अनुभवले आहे. आता महाविकास आघाडीतील घटकपक्ष असणाऱ्या काँग्रेसचे नेते संजय निरुपम यांनीही शिवसेनेला धारेवर धरले आहे.

निरुपम म्हणाले की, मुंबई महापालिकेत शिवसेना पूर्णपणे अपयशी ठरले आहे. मुंबईच्या खराब परिस्थितीला केवळ आणि केवळ शिवसेना जबाबदार आहे. शिवसेनेचे मुंबई महापालिकेतील अपयश हाच काँग्रेसचा मुंबई महापालिकेतील निवडणुकीचा मुख्य मुद्दा असणार आहे, अशा शब्दांमध्ये निरुपम यांनी शिवसेनेवर आरोप केला आहे. आता यावर शिवसेना काय प्रतिक्रिया देणार, याची उत्सुकता लागली आहे.

हे ही वाचा:

डिसले यांचा शिक्षणासाठी अमेरिकेत जाण्याचा मार्ग मोकळा

नागपुरात नग्न नृत्याचा ‘हंगामा डान्स’

एक व्यंगचित्र ठरणार आम आदमी पक्षाची डोकेदुखी?

राजपथवर धावणार महाराष्ट्राचा चित्ररथ

 

काँग्रेस नेते संजय निरुपम हे नेहमीच शिवसेनेवर टीका करत असतात. यापू्र्वीही त्यांनी परमबीर सिंह प्रकरणात एक ट्वीट करून खळबळ उडवली होती. ते ट्वीटमध्ये म्हणाले होते की, ” हे मुंबई पोलिसांचे माजी पोलिस आयुक्त आहेत. मंत्र्यावर खंडणी वसुलीचा आरोप लावला होता. आणि हेच स्वत: पाच प्रकरणात वॉन्टेड आहेत. आता त्यानंतर पुन्हा एकदा महापालिका निवडणुकीत निरुपम सक्रिय झाल्याचे दिसत आहेत. ते शिवसेनेची अडचण करणार हे नक्की.

Exit mobile version