लस निर्यातीवरून प्रियांकांचे किळसवाणे राजकारण

लस निर्यातीवरून प्रियांकांचे किळसवाणे राजकारण

परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी अनेकवेळा मुलाखतींमधून कच्चा माल आयात केल्यानंतर त्या देशांना आपण लस देणेही बंधनकारक असल्याचे स्पष्ट केले आहे. तरीही काँग्रेस आणि गांधी परिवाराकडून याबाबत लोकांची दिशाभूल केली जात आहे. काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी वाडरा यांनी एका मुलाखतीत भारताला गरज असताना लशींची निर्यात कशाला, असा नेहमीचा सवाल केला आहे. परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी याआधीच यामागील कारणमीमांसा स्पष्ट केली आहे. एका मुलाखतीत त्यांनी हे स्पष्ट केले होते की, अन्य देशांकडून लशींच्या उत्पादनासाठी कच्चा माल घ्यायचा मात्र त्यांना लसीचा पुरवठा करायचा नाही, असा विचार करणारे बेजबाबदार आहेत. हे स्पष्टीकरण मिळालेले असतानाही काँग्रेस आणि गांधी-वद्रा परिवाराकडून वारंवार लशींच्या निर्यातीवर राजकारण केले जात आहे.

हे ही वाचा:

राज ठाकरेंनी पुन्हा लिहिले मोदींना पत्र

२४ एप्रिलपासून तरुणांच्या लसीकरणाची नोंदणी सुरु

फायझरची लस भारतात ‘ना नफा’ तत्वावर मिळणार

शिवसेना नेत्यानेच केले ठाकरे सरकारला लक्ष्य

नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत पुन्हा एकदा प्रियांका गांधी यांनी तोच मुद्दा उकरून काढला आहे. त्या म्हणाल्या की, गेल्या काही महिन्यांत भारतातून ६ कोटी लशी परदेशात निर्यात करण्यात आल्या. मग त्या भारतीयांना का देण्यात आल्या नाहीत? तेव्हा ३-४ कोटी लोकांनाच लशी दिल्या गेल्या.

एस. जयशंकर यांनी अनेक मुलाखतीत हे स्पष्टीकरण केले आहे की, आपल्या देशाला लशींची गरज असताना भारताकडून काही प्रमुख देशांना आवाहन करण्यात आले की, भारतात लशींच्या उत्पादनासाठी तुम्ही कच्च्या मालाचा स्रोत सुरू ठेवा. एकीकडे या देशांना भारतातील लशींच्या उत्पादनासाठी कच्च्या मालाचा पुरवठा करायला सांगायचा आणि दुसरीकडे त्यांना लसी निर्यात करायच्या नाहीत, हे हास्यास्पद ठरणार नाही का?

जयशंकर यांनी म्हटले होते की, भारतात बनविण्यात येणारी ही लस हे आंतरराष्ट्रीय उत्पादन बनले आहे. त्यात सगळ्यांचा वाटा आहे. आपण इतर देशांना लस का देत आहोत, असा प्रश्न विचारणाऱ्यांना हे सांगावेसे वाटते की, आपण भारतीयांना प्राधान्याने लस देत आहोतच. या देशांशी संवाद साधताना भारतालाही या लशींची किती गरज आहे, त्यासाठी कच्च्या मालाचा सातत्याने पुरवठा करणे किती आवश्यक आहे, हे आम्ही सांगतो आहोत. मग जर कुणी असा सवाल उपस्थित करत असेल की, तुम्ही कशाला इतर देशांना लशी देत आहात तर कदाचित त्या देशातील कुणी असा सवाल उपस्थित करेल की, तुम्ही त्यांना कच्चा माल का पुरवित आहात? जे लोक बेजबाबदार आहेत, जे कशाबद्दलही गंभीर नाहीत, असे लोक अशी वक्तव्ये करू शकतात.

पप्पू कुटुंबियांना हे समजणे कठीण

यासंदर्भात भाजपा नेते आमदार अतुल भातखळकर यांनीही ट्विट करून पप्पू कुटुंबियांना जयशंकर यांचे म्हणणे समजण्याची शक्यता कमी आहे, अशा शब्दांत खरपूस समाचार घेतला आहे. कोरोना लशीच्या कच्च्या मालासाठी अन्य देशांवर अवलंबून असलेल्या भारताला आयात माल वापरून बनवलेली लस निर्यात करणे बंधनकारक आहे, ही गोष्ट परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी समजावून सांगितली आहे. अर्थात, पप्पू कुटुंबियांना ती समजण्याची शक्यता कमी आहे, असे भातखळकर यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

Exit mobile version