“महाविकास आघाडीत राहायचं का? याचा विचार करावा लागेल”

“महाविकास आघाडीत राहायचं का? याचा विचार करावा लागेल”

विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीची २१ मतं फुटल्यावर खळबळ माजली आहे. भाजपाच्या पाचही उमेदवारांचा विजय झाला असून काँग्रेसमध्ये पहिल्या पसंतीच्या उमेदवाराच्या पराभवानं प्रचंड नाराजी आहे. यानंतर काँग्रेसचे माजी मंत्री आणि ज्येष्ठ नेते नसीम खान यांनी खळबळजनक वक्तव्य केले आहे.

“यापुढे महाविकास आघाडीत राहायचं का? याचा विचार करावा लागेल. काँग्रेसला महाविकास आघाडीत काय मिळतंय? याचा विचार करणं गरजेचं आहे,” असं नसीम खान म्हणाले आहेत. त्यामुळे काँग्रेस महाविकास आघाडीतून बाहेर पडणार का? याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. विधानपरिषदेतील पराभवानंतर महाविकास आघाडीतील मतभेद उघड झाले आहेत.

पहिल्या पसंतीचे उमेदवार चंद्रकांत हंडोरे यांच्या पराभवानं काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आले असून काँग्रेसचे अनेक नेते आता दिल्लीला जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

हे ही वाचा:

राहुल गांधींची ईडीकडून पाचव्यांदा होणार चौकशी

विधान परिषद निवडणुकीतही भाजपाने दिला महाविकास आघाडीला धोबीपछाड; पाचही उमेदवार विजयी

अनिल परबांना उद्या ईडीसमोर चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश

टिळक, जगताप यांच्या मतदानावरील आक्षेप फेटाळले

विधान परिषदेच्या १० जागांसाठी सहा उमेदवार रिंगणात होते. पाच उमेदवार भाजपाचे होते तर सहा उमेदवार महाविकास आघाडीचे होते. भाजपाच्या पाचव्या उमेदवारासाठी पुरेशी मतं नसतानाही भाजपाचे पाचही उमेदवार विजयी झाले आहेत. त्यामुळे राज्यसभा निवडणुकीप्रमाणे विधान परिषदेतही विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची रणनीती यशस्वी झाल्याचे चित्र आहे.

Exit mobile version