लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात महाविकास आघाडी जागा वाटप करून चर्चांना पूर्णविराम दिलेला असला तरी काही जागांवरून अजूनही धुसपूस सुरू आहे. अशातच आता महाराष्ट्र काँग्रेसला एक मोठा धक्का बसला आहे. महाविकास आघाडीमध्ये काही जागांवरून नाराजीनाट्य रंगल्यानंतर काँग्रेसमध्ये अंतर्गत धुसफूस मोठ्या प्रमाणावर आहे. सांगलीच्या जागेवरून जोरदार वाद सुरू असताना उत्तर मध्य मुंबईसाठी काँग्रेसने वर्षा गायकवाड यांना उमेदवारी जाहीर केली. मात्र, त्यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर काँग्रेसचे नेते, माजी मंत्री नसीम खान यांनी उघडपणे आपली नाराजी व्यक्त केली आहे.
उत्तर मध्य मुंबईतून तिकीट मिळविण्यासाठी नसीम खान प्रयत्नशील होते मात्र पक्षाने वर्षा गायकवाड यांना संधी दिल्याने खान यांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त केली आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांना पत्र लिहून आपण स्टार प्रचारक पदाचा आणि प्रचार समितीच्या सदस्यत्वाचा राजीनामा देत असल्याचे नसीम खान यांनी स्पष्ट केले आहे. तसेच काँग्रेसने राज्यात एकही मुस्लीम उमेदवार दिलेला नाही, याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
हे ही वाचा:
इस्रायल-पॅलेस्टाईन युद्धाचा आंबा निर्यातीला फटका
मतदाना ऐवजी तरुणाने घातला ईव्हीएम मशीनवर कुऱ्हाडीचा घाव!
लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात सरासरी ६४.२१% मतदान!
इस्रायल-पॅलेस्टाईन युद्धाचा आंबा निर्यातीला फटका
“काँग्रेसला मुस्लीमांची मते तर हवी असतात, पण त्यांना उमेदवारी का नाही?” असा प्रश्न नसीम खान यांनी पक्षाला विचारला आहे. तसेच त्यांनी पत्र लिहित नसीम खान यांनी आपली नाराजी उघड केली आहे. वर्षा गायकवाड यांना तिकीट मिळताच नसीम खान नाराज झाले आहेत. नसीम खान यांनी खरगेंना लिहिलेल्या पत्रात म्हटले की, ठमहाविकास आघाडीने महाराष्ट्रातील ४८ लोकसभा मतदारसंघापैकी एकाही मतदारसंघात मुस्लीम उमेदवार दिलेला नाही. राज्यातील अनेक मुस्लीम संघटना, नेते आणि पक्षातील कार्यकर्ते यांना अपेक्षा होती की, काँग्रेस पक्ष तरी निदान एखाद्या मुस्लीम नेत्याला उमेदवारी देईल. पण, दुर्दैवाने काँग्रेसनेही उमेदवारी दिलेली नाही.” तसेच त्यांनी म्हटले आहे की, लोकसभा मतदानाचे जे टप्पे उरले आहेत, त्याच्या प्रचारात सहभागी होणार नाही.
Congress leader Mohammad Arif (Nasim) Khan has resigned from the position of star campaigner for the remaining phases of the Lok Sabha elections. pic.twitter.com/oA7B0uivVW
— IANS (@ians_india) April 26, 2024