पाकला सन्मान द्या, नाहीतर अणुबॉम्ब फोडतील! मणिशंकर अय्यर यांनी दिला फुलटॉस

काँग्रेसचे वरिष्ठ नेते मणिशंकर अय्यर यांच्या विधानामुळे काँग्रेस अडचणीत

पाकला सन्मान द्या, नाहीतर अणुबॉम्ब फोडतील! मणिशंकर अय्यर यांनी दिला फुलटॉस

वारसा संपत्ती आणि वर्णभेदावरुन केलेल्या वक्तव्यामुळे काँग्रेसचे माजी अध्यक्ष सॅम पित्रोदा हे अडचणीत आले असून नव्या वादाला तोंड फुटले आहे. अशातच आता काँग्रेसच्या आणखी एका नेत्याच्या वक्तव्यामुळे वादाची ठिगणी पडली आहे. काँग्रेसचे वरिष्ठ नेते मणिशंकर अय्यर यांनी पाकिस्तान संदर्भात एक अजब आणि मोठं विधान केलं आहे. मणिशंकर अय्यर यांनी म्हटलं आहे की, पाकिस्तानजवळ अणुबॉम्ब आहे. त्यामुळं त्यांना सन्मान दिला पाहिजे. काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांनी एका मुलाखतीत त्यांचे हे मत व्यक्त केले आहे.

पाकिस्तानला आपण सन्मान दिला पाहिजे. जर सन्मान दिला नाही तर ते बॉम्ब फोडतील. पाकिस्तान सोबत चर्चा करण्याची गरज असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. मागील १० वर्षांपासून हे सगळं बंद असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. पाकिस्तानला सुद्धा इज्जत आहे. त्यांच्याशी चर्चा करायला हवी. बंदुका घेऊन फिरत आहोत यावर उपाय कसा निघेल? तुम्ही त्यांच्याकडे लक्ष देत नाहीत,” अशा आशयाचे वक्तव्य मणिशंकर अय्यर यांनी केले आहे. अय्यर यांच्या या वक्तव्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपला टीकेसाठी चांगला मुद्दा मिळाला आहे. भाजप नेत्यांनी काँग्रेसला लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे.

अय्यर पुढे असेही म्हणाले की, मोदी सरकारचे पाकिस्तानशी न बोलण्याचे धोरण अत्यंत धोकादायक आहे, कारण ‘काही वेडे नेते’ अपमानाने वेडे होतील आणि लाहोरमध्ये स्वतःच बॉम्बस्फोट करतील. लाहोरमध्ये अणुबॉम्ब फुटला तर त्याचे परिणाम काही मिनिटांतच अमृतसरला पोहचतील.

हे ही वाचा:

बडतर्फ केलेल्या सर्व केबिन क्रूला पुन्हा घेतले एअर इंडियाच्या ‘विमाना’त

‘तुम्ही भारतीय आहात म्हणून तुम्हाला मत दिले नसते’

‘या’ पाच कारणांमुळे सेन्सेक्स गडगडला

हनी ट्रॅप प्रकरण; ‘सोनल’ बनून आयएसआयने लष्करी ड्रोन डेटा मिळवला

पाकिस्तानचा अजेंडा काँग्रेस नेत्यांकडून रेटवला जात असल्याचा आरोप भाजपा नेत्यांनी केला होता. पाकिस्तानी नेत्यांनी राहुल गांधी यांचे गोडवे गायले आहेत यावरूनही टीकास्त्र डागण्यात आले होते. त्यात आता मणिशंकर अय्यर यांच्या वक्तव्यामुळे काँग्रेसला पुन्हा एकदा घेरलं जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Exit mobile version