28.9 C
Mumbai
Sunday, April 27, 2025
घरराजकारणकाँग्रेसच्या कन्हैय्याकुमारचे नरेंद्र मोदी, अमित शहा, रा.स्व. संघाविरोधात आकांडतांडव

काँग्रेसच्या कन्हैय्याकुमारचे नरेंद्र मोदी, अमित शहा, रा.स्व. संघाविरोधात आकांडतांडव

मुलाखत, पत्रकार परिषदेत गमावले संतुलन

Google News Follow

Related

कम्युनिस्ट पार्टीमधून काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर कन्हैय्याकुमारने आता पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांना शिव्या देण्याचा चंग बांधला आहे. पत्रकारांशी झालेल्या संवादादरम्यान कन्हैय्याकुमारने विरोधक असलेल्या भाजपाच्या नेत्यांवर अश्लाघ्य भाषेचा वापर केला.

एका पत्रकार परिषदेत पत्रकाराने त्याला तहव्वूर राणाच्या हस्तांतरणाविषयी प्रश्न विचारल्यावर त्या पत्रकारावर उखडत कन्हैय्याकुमारने राणाला भारतात आणणे हे इतर मुद्द्यांवरून लक्ष हटविण्यासाठी भाजपा सरकारने उचललेले पाऊल आहे असे म्हटले. शिवाय, माझ्या खात्यात १५ लाख आले की काय यावर तुम्ही विचारत आहात का, असेही तो म्हणाला. अमित शहा यांनी हा भारताच्या कूटनीतीचा विजय असल्याचे म्हटले आहे यावर कन्हैय्याकुमार म्हणाला की,  अमित शहांनी आपल्या मुलाला बीसीसीआयचे सचिव केले, आयसीसीचे अध्यक्ष केले. कन्हैय्याकुमारने अरे तुरेच्या भाषेत अमित शहांवर टीका केली. वेगवेगळे मुद्दे काढून लोकांना संभ्रमित केले जात आहे. कधी वक्फचा मुद्दा तर कधी आणखी कुठला मुद्दा आणून लोकांना मुख्य प्रश्नांपासून दूर नेले जात आहे.

हे ही वाचा:

कल्याण बलात्कार प्रकरणातील आरोपी विशाल गवळीची तुरुंगात आत्महत्या!

ममता सरकार पूर्णपणे अपयशी

वडेट्टीवार, देशात लुटारूंची सोनेरी टोळी एकच

बंगालमध्ये बुकी मिथुन चक्रवर्तीची हत्या

त्यानंतर कन्हैय्याकुमारने एबीपी लाइव्हला दिलेल्या मुलाखतीत मेघा प्रसाद यांना सांगितले की, नरेंद्र मोदी हे संघी आहेत. त्यावर प्रसाद यांनी विचारले की, संघी हा शब्द तुम्ही जणू काही शिवी असल्याप्रमाणे उच्चारत आहात. त्यावर कन्हैय्याकुमार म्हणाला की, होय ही शिवी आहे. ज्यांनी गांधीजींची गोळ्या घालून हत्या केली, त्यांच्याबद्दल असाच शब्द वापरला जाणार. केवळ शिवी नाही तर आरएसएसचे सदस्य हे दहशतवादी आहेत. गांधीजींना गोळी घालणे योग्य होते का?

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,000चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
245,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा