काँग्रेसला मोठा धक्का; जितिन प्रसाद भाजपात

काँग्रेसला मोठा धक्का; जितिन प्रसाद भाजपात

काँग्रेसमधील अस्वस्थतेला वाट मोकळी करणारा निर्णय काँग्रेसचे नेते जितिन प्रसाद यांनी घेतला आणि त्यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्या उपस्थितीत जितिन प्रसाद यांचे भाजपात स्वागत करण्यात आले. भाजपाच्या मुख्यालयात जितिन प्रसाद यांचे गोयल यांनी स्वागत केले आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांना शुभेच्छा दिल्या.

बुधवारी सकाळपासून एक मोठा नेता भाजपात दाखल होणार असे वृत्त प्रसिद्ध होत होते. नंतर जितिन प्रसाद यांचे नाव पुढे आले. अखेर त्यांच्या भाजपा प्रवेशावर शिक्कामोर्तब झाले.

हे ही वाचा:

कोरोनाच्या संकटातही उल्हासनगरात स्टेडियमसाठी २५ कोटींची मंजुरी

वारकऱ्यांच्या ‘बायो-बबल’ पर्यायाचा पाठपुरावा मुख्यमंत्र्यांकडे करणार

बार्बरा आणि मेहुल चोक्सीचे काय संबंध होते? बार्बरानेच दिली माहिती

संजय राऊत यांच्यावर आरोप करणाऱ्या स्वप्ना पाटकर यांना अटक

यावेळी पत्रकार परिषदेत बोलताना जितिन प्रसाद म्हणाले की, आमच्या तीन पिढ्यांचा काँग्रेसशी संबंध राहिलेला आहे. त्यामुळे मी खूप विचाराअंती भाजपात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. गेल्या ८ ते १० वर्षांत मला असे वाटू लागले होते की, जर राष्ट्रीय पक्ष म्हणून कुणी असेल तर तो भाजपा आहे. इतर पक्ष हे प्रादेशिक आहेत. राष्ट्रीय पक्ष केवळ भाजपा आहे. देशाचा विचार करणारा नेता किंवा पक्ष जर कोणता असेल तर तो पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्ष आहे.

जितिन प्रसाद यांच्याकडे पश्चिम बंगालच्या निवडणुकीची जबाबदारी काँग्रेसने सोपविली होती पण त्यात त्यांना अपयश आले. काँग्रेसला तिथे भोपळाही फोडता आला नाही.

Exit mobile version