सोशल मीडिया हा आता जवळपास सगळ्यांच्याच आयुष्यातील एक अविभाज्य घटक बनला आहे. पण जसे सोशल मीडिया आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग बनला आहे, तसेच सोशल मीडियावर होणारे ट्रोलिंग ही देखील एक नित्याची बाब बनली आहे. अनेक प्रसिद्ध व्यक्तींना जवळपास रोज या ट्रॉलिंगचा सामना करावा लागतो. विविध पक्षांच्या राजकीय नेत्यांसाठी तर ही सर्वाधिक नैमित्यिक बाब आहे. पण विरोधी पक्षाच्या समर्थकांकडून ट्रोल होणाऱ्या एका राजकीय नेत्याला आता त्याच्याच समर्थकांनी ट्रोल केले आहे. काँग्रेस नेते सत्यजित तांबे यांनी नुकताच याचा अनुभव घेतला आहे.
महाराष्ट्र भूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचा काही दिवसांपूर्वी वाढदिवस झाला. त्यांनी वयाची ९९ वर्ष पूर्ण करून शंभरीत प्रवेश केला. एकीकडे साऱ्या महाराष्ट्रातून जेव्हा बाबासाहेबांवर शुभेच्छांचा वर्षाव होत होता. अशातच महाराष्ट्र युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी सुद्धा बाबासाहेब पुरंदरे यांना शुभेच्छा दिल्या. पण काँग्रेस पक्षाच्या समर्थकांनी तांबे यांना ट्रोल केले.
हे ही वाचा:
राहुल गांधीचा नेम पुन्हा चुकला
भारतातील कम्युनिस्ट पक्षांआडून चीन खेळत होता डावपेच
अहिंसेच्या विचारांना काँग्रेसनेच दिली मूठमाती; उपसभापतीला मारहाण
हे प्रकरण इतके वाढले की सत्यजित तांबे यांना एक पत्रक काढून स्पष्टीकरण द्यावे लागले. मला बाबासाहेब पुरंदरे यांचे विचार मान्य नाहीत. लहानपणी त्यांच्यासोबत घालवलेला वेळ आणि त्यांच्यावरच्या प्रेमापोटी आपण ट्विटरवरून शुभेच्छा दिल्याचे सत्यजित तांबे यांनी सांगितले. विचारधारा जुळली नाही म्हणून अनादर करणे मला मान्य नाही असे तांबे यांनी आपल्या स्पष्टीकरणात म्हटले आहे.
280 कॅरेक्टर्समध्ये भावना व्यक्त होऊ शकत नाहीत, म्हणून… pic.twitter.com/zSobmyiROp
— Satyajeet Tambe (@satyajeettambe) August 3, 2021