काँग्रेसची गलिच्छ मानसिकता; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मारण्याचे केले आवाहन

मध्य प्रदेशचे नेते पटेरिया यांचे वादग्रस्त विधान

काँग्रेसची गलिच्छ मानसिकता; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मारण्याचे केले आवाहन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची वाढती लोकप्रियता, जागतिक स्तरावर पंतप्रधान मोदी यांच्यामुळे वाढलेला दबदबा यामुळे अनेकांना पोटदुखी झालेली आहे. मध्य प्रदेशचे काँग्रेस नेता राजा पटेरिया यांनी तर मोदींना मारण्यासाठी सज्ज राहा, असे आवाहन लोकांना केल्यामुळे खळबळ उडाली आहे.

मध्ये प्रदेशमधील काँग्रेसचे माजी मंत्री पटेरिया यांचा एक व्हीडिओ सध्या व्हायरल होत असून त्यात त्यांनी जमलेल्या लोकांना भडकाविण्याचा प्रयत्न केला की, आता मोदींना मारण्याची गरज निर्माण झाली आहे. त्यांनी लोकांसमोर भाषण करताना म्हटले की, पंतप्रधान मोदी हे निवडणुकाच बंद करणार आहेत, धर्माच्या आधारावर लोकांमध्ये फूट पाडणार आहेत, त्यांच्या कार्यकाळात दलितांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे तुम्हाला मोदींना मारावे लागेल. अर्थात, त्यांना पराभूत करावे लागेल. हा व्हीडिओ नंतर भाजपा मध्य प्रदेशचे प्रवक्ते राजपाल सिसोदिया यांनी व्हायरल केला. प्रथम फेसबुकवर आणि नंतर ट्विटरवर टाकून त्यांनी हे विधान लोकांपर्यंत पोहोचविले.

हे ही वाचा:

गोपीनाथ मुंडे : जनसामान्यांचा नेता

भूपेंद्र पटेल यांनी सलग दुसऱ्यांदा घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ

अनिल देशमुख्यांच्या जामिनावर टांगती तलवार

नागपूर मेट्रोने कोरले गिनीज बुकात नाव

भाजपाच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनीही हा व्हीडिओ शेअर करत त्यावर टीका केली. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, काँग्रेस ही प्रचंड निराश झाली आहे आणि मोदींना मारण्यासाठी सज्ज होत आहे. चन्नी यांच्या प्रशासनाने काय केले हे आपण पाहिलेच आहे, पंजाबमध्ये. जवळपास त्यांनी ती योजना अमलात आणलीच होती.

यावर भाजपाचे मध्य प्रदेशातील गृहमंत्री नरोत्तम मिश्रा म्हणाले की, मी पटेरिया यांचे भाषण ऐकले. त्यांच्या या भाषणावरून स्पष्ट होते की, ही महात्मा गांधी यांची काँग्रेस नाही. ही इटलीची काँग्रेस आहे. इटली म्हणजे मुसोलिनी. मी पोलीस अधीक्षकांना सांगून याविरोधात तात्काळ एफआयआर दाखल करण्यास सांगत आहे. पटेरिया यांच्याविरोधात एफआयआर दाखल होणार आहे. आपल्या विधानामुळे खळबळ उडाल्यानंतर पटेरिया यांनी आपल्या विधानाचा विपर्यास करण्यात आल्याचे म्हटले. मी गांधींवर विश्वास ठेवतो. मी असे बोलूच शकत नाही. संविधानाचे रक्षण करण्यासाठी मोदींना पराभूत करणे आवश्यक आहे. दलितांचे, आदिवासींचे अधिकार संरक्षित करण्यासाठी मोदींना पराभूत करायलाच हवे. मोदींना मारायला हवे, याचा वेगळाच अर्थ काढण्यात आला.

Exit mobile version