25.9 C
Mumbai
Monday, January 6, 2025
घरक्राईमनामाकाँग्रेस नेत्याची आता थेट भोसले राजघराण्याकडून वसूली

काँग्रेस नेत्याची आता थेट भोसले राजघराण्याकडून वसूली

Google News Follow

Related

नागपूरच्या भोसले राजघराण्याशी संबंधित काहींना धमकावून खंडणी वसूल करण्याच्या प्रयत्नात असलेल्या काँग्रेस नेत्याला पोलिसांकडून रंगेहाथ अटक करण्यात आली आहे. त्रिशरण सहारे असं अटक झालेल्या काँग्रेस नेत्याचं नाव असून तो एकेकाळी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांचा विश्वासूही होता.

त्रिशरण सहारे गेल्या काही दिवसांपासून नागपूरचे संस्थानिक असलेल्या भोसले राजघराण्यातील काहींना धमकावून खंडणी वसूल करण्याच्या प्रयत्न करत होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीप्रमाणे नागपूरच्या उमरेड तालुक्यात भोसले राजघराण्याची वडिलोपार्जित जमीन असून काही वर्षांपूर्वी नागपूरचा कुख्यात गुंड रणजीत सफेलकरशी संबंधित काही लोकांनी ती जमीन खरेदी करण्यासाठी राजघराण्यातील काही लोकांशी सौदा केला होता. ठरलेल्या रकमेपैकी काही रक्कम त्यांच्या बँक खात्यात जमाही करण्यात आली होती. मात्र पुढे तो सौदा पूर्ण होऊ शकला नाही.

काही दिवसांपूर्वी नागपूर पोलिसांनी रणजीत सफेलकर टोळीवर मकोका अंतर्गत कारवाई करत संपूर्ण टोळी गजाआड केली. त्यानंतर रणजीत सफेलकर टोळीच्या जमीन खरेदी व्यवहारांची पोलिसांनी चौकशी सुरु केली. त्याच प्रक्रियेत अनेक वर्षांपूर्वी भोसले राजघराण्याशी सफेलकर टोळीतील काहींनी केलेल्या त्या अर्धवट व्यवहाराचे बँक ट्रान्झॅक्शन पोलिसांच्या लक्षात आलं. यात कुख्यात गुंड रणजीत सफेलकरच्या बँक खात्यातून व्यवहार झाल्यामुळे पोलिसांनी भोसले राजघराण्यातील संबंधित लोकांना बोलावून त्या अर्धवट राहिलेल्या जमीन व्यवहाराची माहिती घेतली. पोलीस राजघराण्यातील लोकांना बोलावून चौकशी करत आहेत ही बाब काँग्रेसचा स्थानिक नेता त्रिशरण सहारेला माहित पडली आणि त्याने त्याच माहितीचा फायदा घेण्याचे ठरवत राजघराण्यातील लोकांना ब्लॅकमेल करणे सुरू केलं.

तुमची पोलीस चौकशी सुरु आहे. तुमचे कुख्यात गुंड रणजीत सफेलकरसोबत व्यवहार आहेत. माझ्याकडे त्याचे काही पुरावे आहेत. ही सर्व माहिती पत्रकारांच्या माध्यमातून चव्हाट्यावर आणेन. विविध प्रसारमाध्यमांसमोर आणेन, अशी धमकी देऊन त्रिशरण सहारे भोसले राजघराण्यातील नातू किरदत्त यांना चार लाख रुपये खंडणी मागू लागला. मात्र, आपली काहीही चूक नाही. जमिनीचा व्यवहार नियमाप्रमाणे करत होतो. तो व्यवहारही पूर्ण झाला नाही. त्याची संपूर्ण माहितीही पोलिसांना दिली आहे. त्यामुळे एका नेत्याच्या ब्लॅकमेलिंगला बळी पडायचं नाही असं ठरवत त्यांनी पोलिसांकडे तक्रार केली.

हे ही वाचा:

स्पुतनिकची पहिली खेप आज भारतात पोहोचणार

काल पवारांची भेट, आज खडसेंच्या घरी, फडणवीसांच्या भेटींमुळे राजकीय चर्चांना उधाण

भारताने फटकारल्यानंतर डब्ल्यूएचओने कोरोना उपप्रकाराचे नाव बदलले

कोरोना बाधितांच्या संख्येत २५ हजारांची घट, कोरोनाबळींची संख्याही कमी

थेट राजघराण्याला ब्लॅकमेल करण्याचं हे प्रकरण पोलिसांनी गांभीर्याने घेतलं. त्यानंतर ब्लॅकमेलिंगचे आरोप लागलेल्या त्रिशरण सहारेला पोलिसांच्या खंडणीविरोधी पथकाने सापळा रचून मेयो रुग्णालय चौकातून रंगेहाथ अटक केली. एका काँग्रेस नेत्याला थेट राजघराण्याच्या लोकांना ब्लॅकमेल करण्याच्या या प्रकरणावर सध्या काँग्रेस पक्षाने मौन साधलं आहे. या प्रकरणात आणखी काही लोकांचा समावेश आहे का याचा तपास पोलीस करत आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
220,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा