‘काँग्रेस की लूट जिंदगी के साथ भी, जिंदगी के बाद भी’

पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल

‘काँग्रेस की लूट जिंदगी के साथ भी, जिंदगी के बाद भी’

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज छत्तीसगड दौऱ्यावर आहेत.पंतप्रधान मोदींनी छत्तीसगडमधील सुरगुजा येथील जाहीर सभेला संबोधित करताना काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला.पंतप्रधान म्हणाले की, काँग्रेस हिंसा करणाऱ्यांचे समर्थन करत आहे, त्यांना शहीद म्हणत पाठिंबा देत आहे.काँग्रेसच्या एका बड्या नेत्याला अतिरेकी मारल्यावर अश्रू अनावर होतात.काँग्रेसच्या अशा वागण्यामुळेच त्यांनी देशाचा विश्वास गमावला आहे.यावेळी मुख्यमंत्री विष्णुदेव साई, सुरगुजा लोकसभा उमेदवार चिंतामणी महाराज, मंत्री रामविचार नेताम, लक्ष्मी राजवाडे, आमदार रेणुका सिंह यांच्यासह भाजपचे अनेक बडे नेते या कार्यक्रमात सामील होते.

ते पुढे म्हणाले की, शाही परिवारातील राजकुमाराच्या एका सल्लागाराने काही काळापूर्वी म्हटले होते की, मध्यमवर्गीयांवर अधिक कर लावले पाहिजे.आता हे लोक एक पाऊल पुढे गेले आहेत.आता काँग्रेसचे म्हणणे आहे की ते वारसा कर लावणारआहेत, आई-वडिलांकडून मिळालेल्या वारसावरही ते कर लावणार आहे.

हे ही वाचा:

चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडिया पाकिस्तानात जाणार नाही

“नरेंद्र मोदींमुळेचं पाकिस्तान शांत बसलाय”

शाहजहान शेखचा पूर्वीचा अहंकार गायब; पोलीस गाडीत बसून ढाळतोय अश्रू

नोएडातील भंगार माफिया रवी काना, मैत्रीण काजल झा यांना थायलंडमधून अटक!

काँग्रेसवर हल्लाबोल करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, जोपर्यंत तुम्ही जिवंत आहात, तोपर्यंत काँग्रेस तुम्हाला जास्त कर लावून मारून टाकेल आणि जेव्हा तुम्ही जिवंत नसाल, तेव्हा तुमच्यावर वारसा कराचा बोजा लादेल.काँग्रेसचा मंत्र आहे, ‘काँग्रेसची लूट जिंदगीके साथ भी जिंदगीके बाद भी’.काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सॅम पित्रोदा यांनी केलेल्या वक्तव्यावर पंतप्रधान मोदींचे हे वक्तव्य आले आहे.

सॅम पित्रोदा म्हणाले होते की, अमेरिकेत वारसा हक्काने म्हणजे वडिलोपार्जीत मिळालेल्या संपत्तीवर कर आहे. आई किंवा वडिलांचा मृत्यू झाल्यानंतर मुलांना त्यांची १०० टक्के संपत्ती मिळत नाही. त्य संपत्तीतील ४५ टक्के भाग मुलांना मिळतो तर ५५ टक्के भाग हा कर म्हणून सरकार घेते. हा एक चांगला कायदा आहे. त्यांच्या कायद्यात असे म्हटले आहे की, जर तुम्ही तुमच्या कारकिर्दीत संपत्ती निर्माण केली आणि आता ती तुम्ही वारसा हक्काने तुमच्या पुढच्या पिढीला द्या पण त्यातील काही भाग हा लोकहितार्थ दिल पाहिजे. जो कायदा मला योग्य वाटतो. भारतात असे होत नाही, असे ते म्हणाले होते.दरम्यान, सॅम पित्रोदा यांच्या वक्तव्यावर पंतप्रधान मोदींनी प्रत्युत्तर दिले आहे.

 

 

Exit mobile version