काँग्रेसच्या बैठकीत सरदार पटेल यांचा पुन्हा अपमान

काँग्रेसच्या बैठकीत सरदार पटेल यांचा पुन्हा अपमान

भारतीय जनता पक्षाने सोमवारी सरदार वल्लभभाई पटेल यांच्यावर केलेल्या वक्तव्याला काँग्रेसने केलेले ‘पाप’ असल्याचा आरोप केला आहे. “सरदार पटेल यांनी जम्मू -काश्मीरला भारतापासून दूर ठेवण्यासाठी जिना यांच्यासोबत कट रचला होता.” असे वक्तव्य काँग्रेसच्या बैठकीत करण्यात आले होते. हे वक्तव्य १६ ऑक्टोबर रोजी काँग्रेस कार्यकारिणीच्या (सीडब्ल्यूसी) बैठकीदरम्यान करण्यात आले होते. “काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी पटेलविरोधी वक्तव्य करणाऱ्या तारिक हमीद काररा यांना फटकारले का?” असा प्रश्न भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी विचारला आहे.

काँग्रेस नेते तारिक हमीद कर्रा म्हणाले की, “देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरूच होते, ज्यांनी जम्मू -काश्मीरला भारताशी जोडले, तर सरदार पटेल यांनी हे होऊ न देण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला. पटेल यांनी जम्मू -काश्मीरला भारतापासून दूर ठेवण्यासाठी जिना यांच्यासोबत कट रचला होता.” पात्रा यांनी एका मीडिया संवादात सांगितले की, या संपूर्ण प्रकरणाने अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.

हे ही वाचा:

काय आहे इस्रायमधल्या ‘मायबोली’ मराठी मासिकाची कथा?

ठाकरे सरकार म्हणजे, ‘अलीबाबा आणि चाळीस चोर’

हिंदू राष्ट्र मजबूत करण्यासाठी राज ठाकरे जाणार अयोध्येला

सामाजिक न्याय विभागाच्या उपायुक्ताच्या घरी सापडले एक कोटी

सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांचं सरदार पटेल यांच्यावर केलेल्या वक्तव्याला समर्थन आहे का? असा सवालही संबित पात्रा यांनी केला आहे. सीडब्ल्यूसी (काँग्रेस वर्किंग कमिटी) मध्ये तारिक हमीद कर्रा यांची वागणुक, ‘चाटुकारितेची हद्द’ आहे. असे भाजपाने सांगितले. “ते स्वत: जम्मू -काश्मीरमधून आले आहेत आणि राहुल गांधी यांना पुढील काँग्रेस अध्यक्ष म्हणून स्थापित करणे हा त्यांचा एकमेव उद्देश होता. यामुळेच त्यांनी गांधी घराण्याचा गौरव केला. एका कुटुंबाने सर्वकाही केले आणि इतरांनी काहीच केले नाही असं सांगणं हाच त्यांचा हेतू होता. काँग्रेसची अशी मानसिकता कशी असू शकते?” असा प्रश्नही पात्रा यांनी उपस्थित केला.

Exit mobile version