पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चांद्रयान- ३ च्या लँडिंग पॉईंटला ‘शिवशक्ती’ असे नाव दिले आहे. मात्र, यामुळे विरोधकांना पोटशूळ उठल्याचे चित्र आहे. परदेश दौऱ्यावरून परतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शनिवारी बेंगळुरू येथील इस्रो मुख्यालयात जात सर्व शास्त्रज्ञांची भेट घेतली आणि त्यांना संबोधित केले. त्यानंतर काँग्रेस नेते रशीद अल्वी यांनी विक्रम लँडरच्या उतरण्याच्या ठिकाणाला ‘शिवशक्ती’ नाव देण्यावर आक्षेप घेतला आहे. लँडिंग पॉईंटला नाव द्यायला आपण मालक नाही, असंही ते म्हणाले.
रशीद अल्वी म्हणाले की, चंद्राच्या पृष्ठभागाला नाव देण्याचा अधिकार नरेंद्र मोदींना कोणी दिला? हे हास्यास्पद आहे. या नामकरणावर सारे जग हसेल. चांद्रयान- ३ चे लँडिंग अशा ठिकाणी झाले आहे जिथे कोणताही देश पोहोचला नाही. ही अभिमानाची बाब आहे. पण, चंद्र आपल्या मालकीचा नाही किंवा लँडिंग पॉइंटही मालकीचा नाही. सत्तेत आल्यापासून नाव बदलण्याची भाजपची ही सवय असल्याची टीका रशीद अल्वी यांनी केली आहे.
यूपीए सरकारच्या काळात चांद्रयान-१ उतरलेल्या भागाला जवाहर पॉईंट नाव ठेवण्यात आलं होतं, असा प्रश्न विचारल्यावर राशिद अल्वी यांनी म्हटलं, “जवाहरलाल नेहरू यांच्याशी तुलना करू शकत नाही. पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यामुळेच ‘इस्रो’ आहे. १९६२ साली जवाहरलाल नेहरू आणि विक्रम साराभाई यांनी इस्रोची स्थापना केली होती. पंडित नेहरू ‘इस्रो’चे संस्थापक होते. तो विषय पूर्णपणे वेगळा आहे. पण, पंतप्रधान मोदी राजकारण करत आहेत.”
हे ही वाचा:
भामटा मणिशंकर म्हणतोय नरसिंहराव भाजपाचे पहिले पंतप्रधान
हिमाचल प्रदेशात भूस्खलन; ५४ घरे खचल्याची भीती
पृथ्वी ते चंद्रापर्यंतच्या अंतरापर्यंतचे रस्ते गावागावांत बनले
भारताच्या चांद्रयान मोहिमेच्या यशानंतर ब्रिटनने ओकली गरळ
अल्वी यांच्या वक्तव्यावर भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते शहजाद पूनावाला यांनी काँग्रेस नेत्याला घेरले. पंतप्रधान मोदींसाठी देश प्रथम आहे, तर काँग्रेससाठी कुटुंब प्रथम आहे. यूपीएच्या कार्यकाळात असे घडले असते तर चंद्राचे नाव गांधी घराण्यावरून आले असते. इंदिरा पॉइंट किंवा राजीव पॉइंट या नावाने ओळखण्यात आले असते. चांद्रयान- १ ज्या पॉईंटवर उतरले त्या पॉईंटला जवाहर पॉइंट असे नाव देण्यात आले आहे.