‘अग्निपथ योजनेविरुद्ध आंदोलन उचकावण्यात काँग्रेसचा हात’

‘अग्निपथ योजनेविरुद्ध आंदोलन उचकावण्यात काँग्रेसचा हात’

The Minister of State for Social Justice & Empowerment, Shri Ramdas Athawale addressing a press conference, in New Delhi on November 24, 2017.

केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी साध्या काही राज्यांमध्ये अग्निपथ योजनेविरोधात सुरू असलेल्या आंदोलनाविषयी मोठे वक्तव्य केले आहे. तरुणांना भडकावण्यामध्ये विरोधकांचा हात असल्याचे रामदास आठवले म्हणाले.

रामदास आठवले हे आज, १९ जून रोजी अमरावती दौऱ्यावर आहेत. यावेळी रामदास आठवले हे माध्यमांशी बोलत होते. काही राज्यात सध्या हिंसक घटना घडत आहेत. त्यबद्दल त्यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, तरुण या योजनेचा विरोध करायला रस्त्यावर उतरले होते. पण त्यांना आणखी उचकावण्याचं काम विरोधी पक्षांकडून झालं आहे. यात काँग्रेसचा मुख्य हात आहे, असं रामदास आठवले म्हणाले. चर्चेतून मार्ग निघू शकतो त्यामुळे त्यांनी आंदोलकांना शांत करायला हवे होते.

केंद्र सरकारने अग्निपथ योजनेची घोषणा करताच काही राज्यांमध्ये या योजनेला विरोध करण्यासाठी आंदोलनं करण्यात आली. या आंदोलनाला हिंसक वळण मिळाले असून बिहार राज्यात याचे मोठ्या प्रमाणात पडसाद पाहायला मिळत आहेत.

हे ही वाचा:

“मी मुख्यमंत्री असलो काय आणि नसलो काय काहीही फरक पडत नाही”

तोडफोड करणाऱ्या तरुणांना ‘अग्निपथ’चा मार्ग बंद

सायबर चोरट्यांनी सीए तरुणीला दीड लाख रुपयांचा घातला गंडा

बिहारमधून ७१८ आंदोलकांना अटक; १३८ गुन्हे दाखल

दरम्यान, अग्निपथ या योजनेवर होत असलेल्या टीकेनंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि तिन्ही दलांच्या प्रमुखांमध्ये पुन्हा चर्चा झाली. त्यानंतर काही महत्त्वाच्या घोषणा रविवार, १९ जून रोजी करण्यात आल्या. त्यात लेफ्टनंट जनरल अनिल पुरी यांनी स्पष्ट केले की, सेनादलात शिस्तीला महत्त्व आहे. तिथे तोडफोड, दंगे करणाऱ्या तरुणांना अजिबात स्थान नाही. त्यामुळे ती व्यक्ती कोणत्याही अशा आंदोलनात, तोडफोडीत सामील नाही हे त्याला सिद्ध करावे लागेल. त्यासाठी या इच्छुक व्यक्तीने पोलिसांचे प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य आहे. त्याशिवाय, त्याला संधी नाही.

Exit mobile version