पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नांदेडमध्ये घेतलेल्या सभेत काँग्रेसचा खरपूस समाचार घेतला. काँग्रेसने फसवणुकीत स्वतःचेचं रेकॉर्ड्स मोडून काढले आहेत, अशी खोचक टीका नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर केली.
नरेंद्र मोदी म्हणाले की, “काँग्रेसने एकापेक्षा एक घोटाळे केले आहेत. त्यांनी फसवणुकीत स्वतःचेचं रेकॉर्ड्स मोडले आहेत. काँग्रेसच्या लाल पुस्तकावर संविधान लिहिलं आहे, मात्र ते उघडून पाहिलं तर कोरं आहे. संविधानाच्या नावावर लाल पुस्तक छापायचं हे काम काँग्रेसचे आहे. कॉंग्रेसवाले देशात बाबासाहेब आंबेडकरांचे नाही तर स्वतःचे संविधान चालवू पाहत आहेत. काँग्रेसला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचा द्वेष आहे. त्यांनी सर्वात पहिले संविधानासोबत विश्वासघात हा काश्मीरमध्ये केला होता,” अशी टीका नरेंद्र मोदी यांनी केली आहे.
हे ही वाचा..
रामगिरी महाराज, नितेश राणेंच्या अटकेसाठी प्रयत्न, मुस्लीम आरक्षण आणि बरच काही…
‘एक हैं तो सुरक्षित हैं’ बरोबर आता आरएसएसची ‘सजग रहो’ मोहीम
विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाचे ‘संकल्प पत्र’ उद्या जाहीर होणार
पाकिस्तानमधील क्वेटा रेल्वे स्थानकावर भीषण स्फोट; २२ हून अधिक जणांचा मृत्यू
गेल्या दहा वर्षांत दुष्काळावर उपाय योजना केल्या आहेत. मराठवाड्यात ११ सिंचन योजनांना मंजुरी दिली आहे. तसेच नांदेडमध्ये पाच लाखपेक्षा ज्यास्त शेतकऱ्यांना १ हजार ५०० कोटी रुपये दिले आहेत. समृद्धी महामार्गामुळे विकासाला नवी चालना मिळाली आहे. नांदेड ते दिल्ली विमानसेवा सुरू झाली आहे. लवकरच अमृतसरपर्यंतची यात्राही सुरू होणार आहे, अशी माहिती नरेंद्र मोदी यांनी सभेत दिली. भाजप आणि महायुतीच्या समर्थनात एक लाट सुरू असून सगळ्यांच्या तोंडी एकच नारा आहे आणि तो म्हणजे महायुती आहे तर गती आहे, महाराष्ट्राची प्रगती आहे, असंही नरेंद्र मोदी यावेळी भाषणात म्हणाले.