ठाकरे सरकारला काँग्रेसकडून मिळाला घरचा आहेर

ठाकरे सरकारला काँग्रेसकडून मिळाला घरचा आहेर

महाविकास आघाडी सरकारमधील काॅंग्रेस पक्ष पदोन्नतीतील आरक्षणासाठी आक्रमक झालेला आहे. मविआ सरकारला याच्यासारखा चांगला घरचा आहेर कुठलाच नसेल. पदोन्नतीतील आरक्षणाबाबत ठाम राहण्याचा निर्णय काॅंग्रेसने घेतला असून, याबाबत त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्रही पाठवले आहे. काॅंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे या आरक्षणाबाबत अधिकच आक्रमक झाले आहेत. पदोन्नतीतील आरक्षण कायम राहिले पाहिजे त्यात कुठलीही तडजोड चालणार नाही हा ठाम निर्णय काॅंग्रेसचा झालेला आहे.

गेल्या कित्येक दिवसांपासून नाना पटोले आणि शिवसेना यांच्यातील शीतयुद्ध अनेकांच्या नजरेस पडत आहे. संजय राऊत आणि नाना पटोले यांचे तर वरचेवर खटके उडताना दिसत आहेत. एकीकडे राऊत तर दुसरीकडे पटोले असा सामनाच आपल्याला दरदिवशी पाहायला मिळतो. दर दिवशी काही ना काही कारणांवरून राऊत आणि पटोले एकमेकांशी वाद घालत असतात.

हे ही वाचा:

मुंबई-दुबई विमानप्रवासात तो होता एकटाच!

व्यापाऱ्यांच्या संयमाचा कडेलोट; १ जूनपासून शटर उघडणारच

सीबीआयच्या संचालक पदी सुबोध कुमार जैस्वाल

गृह विलगीकरण बंद करण्याचा निर्णय अव्यवहार्य

 

सरकारमधील मंत्री माध्यमांशी बोलताना सर्व आलबेल सुरु आहे असेच सांगतात. कोणीही कितीही सांगितले सर्व आलबेल आहे तरी, हे जे काही घडतंय यामध्ये आलबेल कुठेच दिसत नाही. पटोले यांनी खुलेपणाने सरकारला शिंगावर घेतलेले आहे. त्याच सरकारमध्ये राहून पटोले रोज सरकारला घरचा आहेर देत आहेत. सरकार आमच्यामुळे आहे असे विधान काही दिवसांपूर्वी पटोले यांनी जाहीरपणे केले होते.

सरकारमधून बाहेर पडण्याचा इशाराही काँग्रेसकडून दिला जात असल्याचे वृत्त आहे. पण त्यामागे राजकारणच असल्याचे बोलले जात आहे.

Exit mobile version