काँग्रेस पक्षाच्या २८ डिसेंबर या वर्धापनदिनी हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या हस्ते पक्षाचा झेंडा फडकवताना तो झेंडाच ध्वजस्तंभावरून खाली पडल्यामुळे त्याची सर्वत्र चर्चा सुरू झाली.
सोनिया गांधी यांनी काँग्रेस पक्षाचा झेंडा फडकाविण्यासाठी दोरी ओढली मात्र दोरी ओढताच वरून झेंडा खाली पडला. मात्र नंतर सोनिया गांधी यांनी पुन्हा एकदा झेंडा रितसर फडकाविला. मात्र या घटनेनंतर सोशल मीडियावर त्याची जोरदार चर्चा सुरू झाली.
काँग्रेसचा २८ डिसेंबर २०२१ हा १३७वा स्थापना दिन आहे. या घटनेला आता अपशकून असे म्हटले गेले आहे. काँग्रेसची सध्या देशभरात जी अवस्था आहे, त्याचेच हे प्रतिबिंब आहे का, अशीही चर्चा या घटनेच्या निमित्ताने केली गेली. राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना २८ डिसेंबर १८८५मध्ये झाली होती. ऍलन ह्युम, दादाभाई नौरोजी व दिनशा वाच्छा हे त्या काँग्रेसचे सदस्य होते.
#WATCH | Congress flag falls off while being hoisted by party's interim president Sonia Gandhi on the party's 137th Foundation Day#Delhi pic.twitter.com/A03JkKS5aC
— ANI (@ANI) December 28, 2021
स्वातंत्र्याआधी काँग्रेसची स्थापना झाली आणि नंतरही तो राजकीय पक्ष म्हणून निवडणुकांत उतरला. या पक्षाने १६ निवडणुका लढविल्या आणि त्या ६ वेळा बहुमत मिळविले. पण २०१४ मध्ये काँग्रेसचा दारुण पराभव झाला आणि त्यानंतर त्या पक्षाची प्रत्येकवेळेस घसरण होत राहिली.
हे ही वाचा:
विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक बारगळणार
कोरोना विरुद्धच्या लढाईसाठी आणखी दोन लसींना मान्यता
दिव्यांग रिक्षाचालकाला आनंद महिंद्रा यांनी दिली ‘ही’ ऑफर
गेल्या काही काळात या पक्षाला राष्ट्रीय अध्यक्षही मिळू शकलेला नाही. सोनिया गांधी या हंगामी अध्यक्ष म्हणून काम पाहात आहेत. ५४३ खासदारांच्या संसदेत या पक्षाचे अवघे ४४ खासदार आहेत. त्यामुळे पक्षाचा ध्वज कोसळण्याच्या घटनेकडे त्या दृष्टीकोनातून पाहिले जात आहे.