निधीअभावी काँग्रेसने खासदारांकडेच पसरले हात

निधीअभावी काँग्रेसने खासदारांकडेच पसरले हात

काॅंग्रेसकडे सद्यस्थितीमध्ये रोख फंडाची कमतरता मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे, काँग्रेसने आपल्या खासदारांना त्यांच्या निधीची रक्कम पक्षाच्या निधीमध्ये देण्यास सांगितले आहे. असा आदेशच आता काॅंग्रेसने काढलेला आहे. लोकसभा तसेच राज्यसभेतील सदस्यांना एक पत्र पाठवून या आदेशाचे पालन करण्यास सांगितलेले आहे. काॅंग्रेसच्या तिजोरीत खडखडाट झाल्यामुळे आता पक्षाचे धाबे चांगलेच दणाणले आहेत. तसेच मुख्य म्हणजे २०१४ मध्ये उत्तरप्रदेशातील सत्ता काॅंग्रेसच्या हातून गेल्यानंतर पक्षाचे अस्तित्व खूपच धोक्यात आलेले आहे. त्यामुळेच पक्षाला आता निधीचा तुटवडा फारच मोठ्या प्रमाणावर जाणवत आहे.

पक्ष निधीवर मनमोहन सिंग समितीच्या आधारे ठरवलेल्या निकषांनुसार, प्रत्येक खासदाराने प्रत्येकी २ हजार रुपये योगदान तसेच वार्षिक देय म्हणून ५० हजार रक्कम द्यावी. पक्षाने आता पदाधिकाऱ्यांना प्रवास आणि निवासस्थानावर काटेकोरपणे खर्च करण्यास सांगितला आहे. त्याचबरोबरीने प्रवास खर्चावरही आता लगाम घालावा असे म्हटले आहे. सर्व राज्यातील सचिवांना असे आदेशच आता पक्षाने दिलेले आहेत.

हे ही वाचा:

दुर्दैव! परदेशी शिक्षण घेण्याचे तिचे स्वप्नही वाहून गेले…

अहो, लोकलप्रवास निर्णय लवकर घ्या!

…म्हणून तो फिरत होता सैनिकाच्या वेषात!

कुस्तीपटू बजरंग पुनियाचा पराभव, आता लढणार कांस्यपदकासाठी

पक्षाच्या नव्या नियमांनुसार आता १४०० किमी अंतरापर्यंत काॅंग्रेस सचिवांना ट्रेनने प्रवास करावा लागेल. अंतर १४०० किमी पेक्षा जास्त अंतरासाठी हवाई प्रवासाचा लाभ घेऊ शकतात आणि तेही एका महिन्यातून केवळ दोन वेळाच. विशेष म्हणजे जे सरचिटणीस खासदार देखील आहेत त्यांना हवाई प्रवासाची स्वतःची स्वतः व्यवस्था करण्यास सांगितले आहे. पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना योग्य उपाययोजना आणि कर्मचाऱ्यांद्वारे देखरेख करून कॅन्टीन, स्टेशनरी, वीज यासारख्या उपकरणावरील खर्च कमी करण्यास सांगितले आहे. उत्तरप्रदेशातील सत्ता हातून गेल्यानंतर पक्षाची अवस्था फारच विचित्र झालेली आहे. सध्याच्या घडीला निधीकमतरता पक्षाला चांगलीच सतावू लागलेली आहे.

Exit mobile version