हरयाणामध्ये काँग्रेस पक्ष पुन्हा तोंडावर आपटला

हरयाणामध्ये काँग्रेस पक्ष पुन्हा तोंडावर आपटला

हरयाणामधील भाजपा-जेजेपी सरकारच्या विरोधात काँग्रेस पक्षाने अविश्वास मत प्रस्ताव आणला होता. हा अविश्वास प्रस्ताव हाणून पाडण्यात भाजपा-जेजेपी सरकारला यश आले आहे. प्रस्तावाच्या विरोधात ५५ मतं तर प्रस्तावाच्या बाजूने ३२ मतं होती.

हरयाणाचे सरकार हे भाजपा-जेजेपी आणि काही अपक्ष उमेदवार यांच्या समर्थनाने बनलेले सरकार आहे. हरयाणा विधानसभेत एकूण ९० जागा आहेत.२०१९ च्या निवडणुकीत भाजपाला ४२ जागा, काँग्रेसला २९ जागा, जेजेपीला ११ तर ७ अपक्ष निवडून आले होते. यापैकी भाजपचे ४२, जेजेपीचे ११ आणि काही अपक्ष आमदारांनी सरकारला पाठिंबा दिला होता.

हे ही वाचा:

केरळ निवडणुकांच्या तोंडावर काँग्रेसला मोठा धक्का, ‘या’ बड्या नेत्याने ठोकला रामराम

नंतरच्या काळात काही आमदारांच्या राजीनाम्यामुळे सरकारचे संख्याबळ ५१ पर्यंत आले होते. परंतु आजच्या अविश्वास मत प्रस्तावाच्या विरोधात ५५ मते पडली. तर प्रस्तावाच्या बाजूने ३२ मतं होती. पंजाब आणि हरयाणामध्ये शेतकरी आंदोलनामुळे भाजपा विरोधी वातावरण बनवण्यामध्ये विरोधकांना यश आले होते. याच पार्श्वभूमीवर विरोधकांनी अविश्वास मत प्रस्ताव आणला. जेजेपीचे काही आमदार सरकारचा पाठिंबा काढून घेतील अशी अपेक्षा विरोधकांना होती. पण असे काहीच झाले नाही आणि म्हणूनच अविश्वास मत प्रस्ताव पारित होऊ शकला नाही.

Exit mobile version