25 C
Mumbai
Friday, January 10, 2025
घरराजकारणईव्हीएमच्या वापरापासून काँग्रेसनेच सर्वाधिक विजय मिळविले, तेव्हा आता लाज बाळगा!

ईव्हीएमच्या वापरापासून काँग्रेसनेच सर्वाधिक विजय मिळविले, तेव्हा आता लाज बाळगा!

भाजपा प्रवक्त्या संजू वर्मा यांची टीका

Google News Follow

Related

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांचे निकाल आल्यानंतर महायुतीला जबरदस्त यश मिळाले आणि महाविकास आघाडीचा पुरता धुव्वा उडाला. त्यानंतर ईव्हीएम मशिनवर पुन्हा एकदा आरोप केले जाऊ लागले. महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून, प्रवक्त्यांकडून ईव्हीएम मशिनमध्ये काहीतरी गडबड असल्याचे सांगितले जाऊ लागले. त्यासंदर्भात भाजपाच्या राष्ट्रीय प्रवक्त्या संजू वर्मा यांनी इंडिया टुडेमधील चर्चेत आरोप करणाऱ्यांची चांगलीच हजेरी घेतली.

संजू वर्मा यांनी म्हटले आहे की, ईव्हीएमचा वापर प्राथमिक स्वरूपात केरळातील विधानसभा निवडणुकीत केला गेला. त्यावेळी भाजपाचा विजय झाला नाही. त्यानंतर मोठ्या प्रमाणात ईव्हीएमचा वापर झाला तो १९९८मध्ये. दिल्ली, मध्य प्रदेश आणि राजस्थानातील निवडणुकांत. या तिन्ही निवडणुका काँग्रेसनेच जिंकल्या. भाजपाने नाही. त्यानंतर २००४मध्ये ईव्हीएमचा वापर सार्वत्रिक निवडणुकीत केला गेला. २००९मध्येही ते वापरले गेले. तेव्हाही काँग्रेसचाच विजय झाला. त्यामुळे जेव्हा काँग्रेस आता जी भाषा वापरत आहे ती कोल्ह्याला द्राक्षे आंबट आहेत.

संजू वर्मा म्हणाल्या की, ईव्हीएम मशिनबाबत काही गोष्टी जाणून घेणे आवश्यक आहे. त्यासाठी काही रॉकेट सायन्स माहीत असण्याची अजिबात आवश्यकता नाही. ईव्हीएम मशिन ब्लू टूथला लिंक असते का, तर नाही. कोणत्याही वायरलेस किंवा वायर असलेल्या उपकरणाला जोडलेले असते का तर नाही. त्यामुळे ते हॅक होऊ शकते का तर तेही नाही. ईव्हीएममध्ये डबल रँडमायझेशन थिअरी असते. म्हणजे काय तर ही ईव्हीएम विधानसभा मतदारसंघांसाठी स्वैरपणे उपयोगात आणले जाते. त्यानुसार ते स्वैरपणे मतदान केंद्रांना उपलब्ध करून दिले जाते. हे सगळे निवडणूक अधिकारी तसेच सत्ताधारी पक्षांचे प्रतिनिधी, विरोधी पक्षांचे प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत होते. पण कर्नाटक, हिमाचल, तेलंगणात विजय मिळविल्यावर ईव्हीएम छान वाटू लागते. मात्र मध्य प्रदेश, राजस्थान, महाराष्ट्रात काँग्रेसचा धुव्वा उडतो तेव्हा रडारड, व्हीक्टिम कार्ड खेळण्यास सुरुवात झाली.

हे ही वाचा:

संभलमधील दंगलखोरांचे फोटो प्रसिद्ध; अल्पवयीन मुलासांह महिलांचाही समावेश

ममता बॅनर्जी यांचा ‘या’ मुद्द्यावरून केंद्रातील मोदी सरकारला पाठींबा!

दिल्लीत भीषण स्फोट, घटनास्थळी सापडला पांढरा पावडरसारखा पदार्थ!

आम्हाला संसद चालवायची आहे

संजू वर्मा यांनी निवडणूक आयुक्त राजीव वर्मा यांच्यावर केल्या जात असलेल्या आरोपांबद्दल सांगितले की, या सगळ्या आरोपांत मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्या प्रामाणिकपणाबद्दल शंका घेतली जाते. नवीन चावला, एस.वाय. कुरेशी, संपत, एम.एस. गिल, टी.एन. शेषन, अशा व्यक्ती मुख्य निवडणूक आयुक्त होत्या, जेव्हा काँग्रेस सत्तेत होती. टी.एन. शेषन हे तर कॅबिनेट सचिव होते आणि नंतर त्यांना नियोजन आयोगातही संधी देण्यात आली. पण तेव्हा सगळे छान होते. त्यामुळे राजीव कुमार यांच्यावर चिखलफेक करताना लाज बाळगा.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
221,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा