आशिया खंडातील सर्वात श्रीमंत महापालिका अशी ख्याती असलेल्या बृहन्मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ही अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. राज्यातील सर्वच प्रमुख राजकीय पक्षांनी या निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. तर प्रत्येकाकडून या निवडणुकीसाठी विशेष अशी रणनीती आखली जात आहे.
देशातील सर्वात जुना पक्ष अशी ओळख असलेल्या काँग्रेस पक्षाने मुंबई महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने आपले प्रयत्न सुरू केले आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोबत राज्याची सत्ता उपभोगणाऱ्या काँग्रेस पक्षाने महापालिका निवडणुकीत मात्र स्वबळाचा नारा दिला आहे. त्यामुळे मुंबईची सत्ता एक हाती काबीज करून आपला महापौर बसवण्यासाठी काँग्रेसचा प्रयत्न सुरू आहेत.
हे ही वाचा:
‘महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट हाच एकमेव मार्ग!’
भारतात कोरोना संदर्भात ‘ही’ दिलासादायक बातमी
बसमध्ये उभ्याने प्रवास करणारे वाढले
नारायण राणे यांचं काही चुकलं नाही
काँग्रेसला जर बीएमसी निवडणूक जिंकून सत्ता काबीज करायची असेल तर महापौर पदासाठी एखाद्या बॉलीवूड मधील कलाकाराचे नाव पुढे केले जावे असा सल्ला काँग्रेस पक्षाच्या स्ट्रॅटेजी कमिटीने दिला आहे. मुंबई काँग्रेसच्या स्ट्रॅटेजी कमिटीचे सचिव गणेश यादव यांनी ही सूचना केली आहे.
त्यासाठी त्यांनी जेष्ठ काँग्रेस नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय विलासराव देशमुख यांचे चिरंजीव रितेश देशमुख, कोविडमध्ये समाज कार्यासाठी प्रसिद्ध झालेला अभिनेता सोनू सूद आणि आपल्या फिटनेससाठी ओळखला जाणारा मॉडेल, अभिनेता मिलिंद सोमण यांची नावे सुचवण्यात आली आहेत. निवडणुकीत युवा मते आकर्षित करण्यासाठी काँग्रेसकडून ही खेळी केली जात आहे.