छत्तिसगढच्या रायपूरमधील गोब्रानवपारा येथील काँग्रेस नगरसेवकाने दिवसाढवळ्या एका स्त्रिवर हल्ला केला.
हाती आलेल्या वृत्तानुसार, या आरोपीचे नाव मंगराज सोनकर असे आहे. त्याने ज्या महिलेवर हल्ला केला त्या महिलेच्या ४ वर्षांच्या मुलीचा खेळता खेळता चुकून गाडीच्या नेमप्लेटला धक्का लागला आणि त्या नेमप्लेटचे नुकसान झाले. त्यानंतर सोनकर याच्या मुलाने त्या मुलीला जोरात मारले होते. जेव्हा काँग्रेसचा नगरसेवक असलेला सोनकर संध्याकाळी घरी परताल तेव्हा त्याने गाडीचे झालेले नुकसान पाहिले, तेव्हा त्याने सदर महिलेस बोलावले आणि वाद घालण्यास सुरूवात केला.
हे ही वाचा:
सनराईज कोविड सेंटरमधील मृत्यु शिवसेनेच्या टक्केवारीचे बळी
भंडारा ते भांडुप…होरपळणारी जनता आणि निर्ढावलेले सरकार
ज्यावेळेला या महिलेने त्याला सांगितले की, त्याच्या मुलाने देखील तिच्या मुलीला मारले, त्यावेळेला सोनकरांचा पारा चढला आणि त्यांनी या महिलेच्या थोबाडीत मारली. त्या महिलेच्या पतीने हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यालाही ढकलून दिले. ज्यावेळेला तो या महिलेला शिवीगाळ करत होता त्यावेळेला इतर नागरिकांनी गप्प राहणेच पसंत केले होते.
या परिसरातील सीसीटीव्ही मध्ये या प्रकाराचे चित्रिकरण झाले आहे आणि ते समाजमाध्यमांवर प्रसिद्ध देखील झाले. या महिलेने नंतर या प्रकाराची तक्रार देखील पोलिस ठाण्यात दाखल केली आहे. पोलिसांनी या महिलेने दाखल केलेला एफआयआर देखील नोंदवून घेतला आहे.
गोब्रानवापारा पोलिस ठाण्यातील अधिकारी क्रिष्णाचंद सिदार यांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार मंगराज सोनकर यांच्याविरुद्ध खटला भरण्यात येणार आहे. या प्रकरणात मंगराज सोनकर यांच्यावर भारतीय दंडविधान संहितेतील कलम २९४, ३२३ आणि ५०६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिस लवकरच या नगरसेवकाला अटक करणार आहे.