छोटू भोयरऐवजी अपक्ष उमेदवाराला देणार पाठिंबा
विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी नागपूरमधून काँग्रेसचे उमेदवार छोटू भोयर यांना मतदानासाठी अवघे १२ तास राहिलेले असताना बदलण्याची नामुष्की काँग्रेसवर ओढवली आहे. काँग्रेसने या जागी अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे.
काँग्रेसने तसे पत्र दिले असले तरी यासंदर्भात रवींद्र तथा छोटू भोयर यांना पूर्वकल्पना दिलेली नव्हती, असे भोयर यांनी एका वृत्तवाहिनीला माहिती दिली आहे.
यासंदर्भात भोयर यांच्याशी एबीपी माझाने संपर्क साधला तेव्हा ते म्हणाले की, मला या उमेदवार बदलाची माहिती नव्हती. माझ्याशी कुणीही बोलले नव्हते. मला थेट पत्र मिळाले.
मात्र यासंदर्भात विरोध करण्याची आपली भूमिका नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. भोयर म्हणतात की, मी जेमतेम १५ दिवसांपूर्वी काँग्रेसमध्ये दाखल झालो आहे. त्यामुळे मी सावधपणे भूमिका घेईन.
हे ही वाचा:
युक्रेनवर आक्रमण केल्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील
महाराष्ट्र सदनातील खोलीत भुजबळ बंद!
आशीष शेलार यांना १ लाखाचा जामीन मंजूर
महाराष्ट्र भाजपा सोशल मीडिया सेलच्या संयोजक पदी प्रकाश गाडे
छोटू भोयर हे भाजपात होते. पण भाजपाला सोडचिठ्ठी देत त्यांनी काँग्रेसमध्ये नुकताच प्रवेश केला होता. विधान परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने भोयर हे भाजपावर नाराज होते. त्यामुळे ते काँग्रेसच्या संपर्कात होते. अखेर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. पण आता विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी त्यांना हटवून अपक्ष उमेदवाराला पाठिंबा देण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पत्र लिहून देशमुख यांना पाठिंबा देणार असल्याचे म्हटले आहे.