ओडिशा: पुरी मतदारसंघातून काँग्रेसच्या उमेदवाराने सोडले मैदान, पक्षाकडे तिकीट केले परत!

काँग्रेस संघटनेच्या महासचिवांना पत्र लिहून सांगितले कारण

ओडिशा: पुरी मतदारसंघातून काँग्रेसच्या उमेदवाराने सोडले मैदान, पक्षाकडे तिकीट केले परत!

लोकसभा निवडणुकीच्या दोन टप्प्याचे मतदान पार पडले असून उर्वरित टप्प्याच्या मतदानासाठी सर्व राजकीय पक्षाकडून जोरदार प्रयत्न सुरु आहेत.मात्र, या निवडणुकीत काँग्रेसला धक्क्यावर धक्के बसत आहेत.यापूर्वी सुरत, इंदूर लोकसभेच्या उमेदवारांनी ऐनवेळी माघार घेतल्याने काँग्रेसला धक्का बसला होता.यानंतर आता पुन्हा एका उमेदवाराने आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. काँग्रेस पक्षाच्या पुरी लोकसभा मतदार संघाच्या उमेदवार सुचारिता मोहंती यांनी निवडणुक लढण्यास नकार दिला आहे. पक्षाकडून निवडणुक लढवण्यासाठी निधी मिळत नसल्याची तक्रार करत सुचारिता मोहंती यांनी तिकीट पक्षाकडे परत केले आहे.

सुचारिता मोहंती यांनी काँग्रेस संघटनेचे महासचिव केसी वेणुगोपाल यांना पत्र लिहून तिकीट परत करण्याबाबत माहिती दिली आहे.निवडणूक लढवण्यासाठी पक्षाने दिलेली रक्कम देण्यात आलेली नाही, त्यामुळे प्रचार करू शकत नाही, असे सुचिता मोहंती आपल्या पत्रात म्हटले आहे.पक्षाच्या निधीशिवाय निवडणूक प्रचार करणे मला शक्य नाही, त्यामुळे मी निवडणूक लढविण्यास नकार दिला आहे. मी तिकीट परत करत आहे, असे मोहंती यांनी स्पष्ट केले आहे.दरम्यान, पुरी मतदारसंघातून काँग्रेसच्या सुचारिता मोहंती यांचा सामना भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा यांच्याशी होता.

हे ही वाचा:

कॅनडा पोलिसांकडून तीन भारतीयांना अटक

‘रोहित वेमुला दलित नाही’; पोलिसांनी केली मृत्यूच्या तपासाची फाइल बंद

अमित शहा एडिटेड व्हिडीओ प्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई, काँग्रेस नेत्याला अटक!

पंतप्रधानांचं ठरलं, १३ मे रोजी वाराणसीमध्ये रोड शो, या दिवशी भरणार उमेदवारी अर्ज!

दरम्यान, पुरी लोकसभा मतदारसंघासाठी २५ मे रोजी मतदान पार पडणार आहे.हे मतदान सहाव्या टप्प्याचे असणार आहे.या जागेसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख ६ मे आहे. भाजपचे उमेदवार संबित पात्रा यांनी यापूर्वीच अर्ज दाखल केले आहेत. तर मोहंती यांचा अर्ज अद्याप प्रलंबित आहे.

Exit mobile version