भारतीय जनता पार्टीचे नेते आमदार अतुल भातखळकर यांनी ‘सत्तेसाठी काँग्रेस देशद्रोह्यांना पाठिंबाही देऊ शकते आणि देशद्रोहही करू शकते’ असे म्हणत काँग्रेसवर हल्ला चढवला आहे. मंगळवारी समाज माध्यमांवर व्हायरल झालेल्या टूलकिट प्रकरणावरून भातखळकरांनी काँग्रेस पक्षावर निशाणा साधला आहे.
मंगळवार, १८ मे रोजी समाज माध्यमांवर एक टूलकिट फिरू लागले आहे. या टूलकिटवर काँग्रेस पक्षाचे निवडणूक चिन्ह आहे. तर काँग्रेसच्या एका संशोधन समितीने टूलकिट बनविल्याचे त्या टूलकिटमध्ये म्हटले आहे. कोविड महामारीच्या मुद्द्यावरून मोदी सरकारला आणि भारतीय जनता पार्टीला कशाप्रकारे लक्ष्य करावे याचे मुद्दे या टूलकिटमध्ये मांडण्यात आले आहेत. या टूलकिटमध्ये अनेक धक्कादायक बाबींचा उल्लेख केला आहे. सारे जग ज्या कोरोना व्हायरसला वूहान व्हायरस म्हणते त्याच्या नव्या स्ट्रेनला ‘भारतीय स्ट्रेन’ अथवा ‘मोदी स्ट्रेन’ म्हणावे असे या टूलकिटमध्ये सांगण्यात आले आहे.
हे ही वाचा:
कोरोनाविषयी जागृती निर्माण करणारे, पद्मश्री डॉ. के. के. अगरवाल यांचे निधन
टोकियो ऑलिम्पिक रद्द करा, स्थानिक डॉक्टरांची मागणी
‘केम छो वरळी’ विचारणारा आमदार कुठे आहे?
नौदलाने वाचवले १४६ मच्छिमारांना
तसेच ओळखीच्या रुग्णालयातले काही बेड्स आपण ताब्यात घ्यावेत आणि आपल्याकडे मदत मागायला येतील त्यांना आपण ते पुररवावेत असे या टूलकिटमध्ये सांगितले आहे. तर समाज माध्यमांवर जी लोकं काँग्रेसच्या अधिकृत खात्याला टॅग करून मदत मागतील त्यानांच फक्त मदत करावी असे या टूलकिटमध्ये सांगण्यात आले आहे.
या टूलकिटच्या मुद्द्यावरूनच भाजपा आक्रमक होऊन काँग्रेसवर निशाणा साधत आहे. आपल्या आक्रमक अंदाजासाठी प्रसिद्ध असणारे भाजपा नेते आमदार अतुल भातखळकर यांनीही ट्विटरवरून काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे. ‘काँग्रेसचे टूल किट खलिस्तान्यांच्या टूल किटपेक्षा कमी खतरनाक नाही’ असे भातखळकरांनी म्हटले आहे. तर ‘सत्तेसाठी काँग्रेस देशद्रोह्यांना पुढे करू शकते वेळ आल्यास देशद्रोहही करू शकते’ असा घणाघात त्यांनी केला आहे.
काँग्रेसचे टूल किट खलिस्तान्यांच्या टूल किटपेक्षा कमी खतरनाक नाही.
'इंडियन व्हायरस, मोदी व्हायरस असे शब्द सोशल मीडियातून व्हायरल करा', असे आदेश यातून काँग्रेस कार्यकर्त्यांना दिले आहेत. सत्तेसाठी काँग्रेस देशद्रोह्यांना पुढे करू शकते वेळ आल्यास देशद्रोहही करू शकते. pic.twitter.com/6FYQveTYrV— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) May 18, 2021